अरविंद केजरीवालांच्या समर्थनार्थ AAP चं सोशल मीडिया कँपेन; नेत्यांनी बदलला प्रोफाइल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 08:18 PM2024-03-25T20:18:44+5:302024-03-25T20:33:18+5:30
Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे सर्व नेते त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अरविंद केजरीवाल यांचा डीपी (प्रोफाइल फोटो) ठेवत आहेत.
आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप सातत्याने निषेधाच्या नवनवीन पद्धती अवलंबत आहे. पक्षाने आता सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे. ज्या अंतर्गत आम आदमी पार्टीचे सर्व नेते त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अरविंद केजरीवाल यांचा डीपी (प्रोफाइल फोटो) ठेवत आहेत.
डीपीमध्ये आम आदमी पार्टीने “मोदींची सर्वात मोठी भीती – केजरीवाल” अशी घोषणा दिली आहे. या कँपेनचे वर्णन करताना दिल्ली सरकारचे मंत्री आणि आप नेते आतिशी म्हणाल्या की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदीजी, भाजपा आणि ईडीने खोट्या प्रकरणात अटक केली आहे, ज्यात 2 वर्षांच्या तपासात एक रुपयाही सापडला नाही.
मोदी का सबसे बड़ा डर - केजरीवाल 🔥
— Atishi (@AtishiAAP) March 25, 2024
मोदी ने साज़िश के तहत लोकसभा चुनाव के ठीक पहले दिल्ली के बेटे अरविंद केजरीवाल को जेल में बंद कर दिया है, दिल्लीवाले इस तानाशाही के खिलाफ अपना विरोध दर्ज़ कराएं 💪💪
मोदी केजरीवाल से डरता है, इस संदेश को जन-जन तक पहुंचाएं
👉 कृपया अपनी… pic.twitter.com/xc4OMQWp33
आप नेत्या आतिशी म्हणाल्या की, मोदीजींना माहीत आहे की त्यांना कोणी आव्हान देऊ शकत असेल तर ते केजरीवाल आहेत. ज्याप्रमाणे रावणाला माहित होतं की भगवान श्रीराम त्याचा नाश करणार आहेत, त्याचप्रमाणे मोदीजींना माहित आहे की एकच नेता मोदींचा पराभव करेल आणि ते म्हणजे केजरीवाल.
आपने सोशल मीडिया डीपी मोहीम सुरू केली आहे. आज आम आदमी पार्टीचे सर्व आमदार आणि नेते डीपी बदलत आहेत. दुपारी तीन वाजल्यापासून सर्वांनी हा डीपी लावायला सुरुवात केली आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून आम आदमी पार्टीवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. एकीकडे दिल्ली भाजपा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, तर दुसरीकडे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत निषेधही करत आहे.