Arvind Kejriwal : "भाजपावाल्यांचा द्वेष करू नका, लवकरच..."; पत्नी सुनीता यांनी सांगितला अरविंद केजरीवालांचा मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 01:04 PM2024-03-23T13:04:30+5:302024-03-23T13:39:00+5:30
Arvind Kejriwal And Sunita Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी जेलमधून पाठवलेला मेसेज वाचून दाखवला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी जेलमधून पाठवलेला मेसेज वाचून दाखवला. अरविंद केजरीवाल यांचा मेसेज वाचताना सुनीता म्हणाल्या - "माझ्या प्रिय देशवासियांनो, मला अटक करण्यात आली आहे."
"मी आत असो वा बाहेर, मी प्रत्येक क्षणी देशाची सेवा करत राहीन. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित आहे, माझे या पृथ्वीवरील जीवन हे संघर्षासाठी आहे. म्हणूनच या अटकेने मला आश्चर्य वाटले नाही. मी माझ्या पूर्वीच्या जन्मात बरीच चांगली कामे केली असतील कारण माझा जन्म भारतासारख्या महान देशात झाला आहे. आपल्याला एकत्र येऊन भारताला पुन्हा एकदा महान बनवायचं आहे. देशाच्या आत आणि बाहेर अनेक शक्ती भारताला कमकुवत करत आहेत."
मुख्यमंत्री @ArvindKejriwal जी ने देशवासियों के लिए Jail से भेजा संदेश:
— AAP (@AamAadmiParty) March 23, 2024
मुख्यमंत्री जी की धर्मपत्नी @KejriwalSunita जी ने पढ़ा संदेश:
मुझे गिरफ़्तार कर लिया गया है। मैं लोहे का बना हूँ।
मेरे शरीर का एक-एक कण देश के लिए है। मेरा जीवन ही संघर्ष के लिए हुआ है।
कुछ देश के अंदर और… pic.twitter.com/flpap0kasa
"मी लवकरच बाहेर येईन, मी माझे वचन पूर्ण करेन"
"आपल्याला सतर्क राहायचे आहे, या शक्तींना ओळखायचे आहे आणि पराभूत करायचे आहे. भारतामध्येच अनेक शक्ती आहेत, ज्या देशभक्त आहेत आणि त्यांना भारताला पुढे न्यायचे आहे. आपल्याला या शक्तींशी जोडले पाहिजे आणि त्यांना आणखी मजबूत करावे लागेल. दिल्लीच्या माझ्या आई आणि बहिणींना वाटत असेल की केजरीवाल आत गेले आहेत आणि त्यांना 1000 रुपये मिळतील की नाही हे माहित नाही. मी लवकरच बाहेर येईन आणि माझे वचन पूर्ण करेन."
"भाजपावाल्यांचा द्वेष करू नका, भाजपावालेही आपलेच भाऊ-बहीण"
"केजरीवाल यांनी आश्वासन दिले आणि ते पूर्ण केले नाही असे आजपर्यंत घडले आहे का? तुमचा भाऊ आणि मुलगा लोखंडाचे बनलेले आहेत, माझी विनंती आहे की कृपया मंदिरात जा आणि माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद घ्या. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की, जनसेवेचे काम थांबू नये आणि यासाठी भाजपावाल्यांचा द्वेष करू नका, भाजपावालेही आपलेच भाऊ-बहीण आहेत. मी लवकरच परत येईन" असं म्हटलं आहे.