मोदीभक्त कधी देशभक्त असू शकत नाहीत, अरविंद केजरीवाल यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:01 PM2019-01-28T18:01:03+5:302019-01-28T18:18:39+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केले आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केले आहे. मोदी भक्त हे कधी देशभक्त असू शकत नाहीत. तसेच देश भक्त हे कधीच मोदी भक्त होणार नाहीत. त्यामुळे आता तुम्ही देश भक्त आहात की मोदी भक्त हे तुम्हाला ठरवावे लागेल, असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे. तसेच केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
केजरीवाल यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांनी देशाचा अवमान केला आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. दरम्यान या ट्विटवरून सुरू झालेला वाद थांबत नाही तोच केजरीवाल यांनी केंद्र सरकराने दिल्लीत शाळा बंधण्यापासून रोखल्याचा आरोप ट्विटरवरून केला.
मोदी भक्त कभी देश भक्त नहीं हो सकता और देश भक्त कभी मोदी भक्त नहीं हो सकता। अब समय आ गया है - आपको तय करना होगा कि आप देशभक्त हो या मोदीभक्त?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 28, 2019
''मोदी सरकारने दिल्लीमध्ये शाळांचे बांधकाम रोखले. लढल्या झगडल्यावर चार वर्षांनंतर कुठे आज 11 हजार वर्गखोल्यांचे काम सुरू झाले आहे. आता तुम्ही मुलांवर प्रेम करायचे की मोदींवर याचा विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल तर आपला मत द्या. मोदींना मत दिल्यास ते पुन्हा शाळांचे बांधकाम रोखतील, असे आवाहन केजरीवाल यांनी ट्विटवरून केले.
मोदी सरकार ने दिल्ली में स्कूल बनने से रोके। लड़ झगड़ के चार साल बाद आज 11,000 कमरे बनने शुरू हुए। आपको सोचना है कि आप अपने बच्चों से प्यार करते हो या मोदी जी से। बच्चों से प्यार करते हो तो AAP को वोट देना। मोदी जी को वोट दोगे तो वो फिर से आपके बच्चों के स्कूल बनने से रोकेंगे https://t.co/qXqOujMHo3
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 28, 2019