रामलीला मैदानाचे नाही, मोदींचे नाव बदला - अरविंद केजरीवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 04:25 PM2018-08-25T16:25:04+5:302018-08-25T16:25:16+5:30

रामलीला मैदानाचे नाव बदलून मते मिळणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदला, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 

arvind kejriwal attacs on bjp over delhi ramlila ground name on atal bihari vajpayee | रामलीला मैदानाचे नाही, मोदींचे नाव बदला - अरविंद केजरीवाल 

रामलीला मैदानाचे नाही, मोदींचे नाव बदला - अरविंद केजरीवाल 

Next

नवी दिल्ली : दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेत प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. रामलीला मैदानाचे नाव बदलून मते मिळणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदला, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, रामलीला मैदानाचे नाव बदलून अटलबिहारी वाजपेयींचे नाव ठेवल्याने मते मिळणार नाहीत. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदलले पाहिजे. त्यामुळे त्यांना काही मते मिळतील. कारण, त्यांना आपल्या नावावर तर मते मिळत नाही आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियात काही नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 

रामलीला मैदानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या चार ते पाच सदस्यांनी हा प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावावर येत्या 30 ऑगस्ट रोजी चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलीला मैदानाचे नाव बदलण्यासाठी सुरुवातीला प्रस्ताव संबंधित महानगरपालिकेच्या नेमिंग कमेटीकडे जाईल. या नेमिंग कमेटीमध्ये महापौर आणि विरोधी नेत्यासह सहा सदस्य यावर चर्चा करतील. तसेच, महापालिकेचे आयुक्त प्रस्ताव दाखल करणा-यांना सदस्यांना कारण विचारतील. त्यानंतर आयुक्तांच्या अहवालानंतर नेमिंग कमिटी नाव बदलण्याचा निर्णय घेतील. 
 

Web Title: arvind kejriwal attacs on bjp over delhi ramlila ground name on atal bihari vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.