केजरीवालांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला सुनावले; म्हणाले, मोदीजी माझे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 03:47 PM2020-01-31T15:47:32+5:302020-01-31T15:55:45+5:30
मतदानाचा दिवस जवळ येताच राजकीय टीका वाढल्या आहेत. भाजपकडून केजरीवाल यांना अतिरेकी संबोधण्यात आले आहे. तर केजरीवाल यांनी देखील भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आला आहे. भाजप-काँग्रेस-आम आदमी पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत असताना पाकिस्तानने यात उडी घेतली आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत पराभूत करावे, असं आवाहन केले. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख केजरीवाल यांनी चौधरी यांना फटकारले.
भारताच्या अंतर्गत घडामोडींमध्ये नाक खुपसू नका, असा इशारा केजरीवाल यांनी चौधरी यांना दिला. दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून चौधरी यांनी ट्विट केले असून भारतातील लोकांनी मोदींचा पराभव करावा. आणखी एक राज्य हातून जात असल्यामुळे मोदींकडून हास्यास्पद दावे करण्यात येत आहेत. काश्मीर, सीएए, एनआरसी आणि आर्थिक स्थिती ढासाळल्यामुळे मोदींचे संतुलन बिघडले आहे, असं चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
नरेंद्र मोदी जी भारत के प्रधानमंत्री है। मेरे भी प्रधानमंत्री है। दिल्ली का चुनाव भारत का आंतरिक मसला है और हमें आतंकवाद के सबसे बड़े प्रायोजकों का हस्तक्षेप बर्दाश्त नहीं। पाकिस्तान जितनी कोशिश कर ले, इस देश की एकता पर प्रहार नहीं कर सकता। https://t.co/E2Rl65nWSK
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 31, 2020
यावर केजरीवाल यांनी ट्विट केले असून ते म्हणाले की, नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत. तसेच ते माझे देखील पंतप्रधान आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक ही आमची अंतर्गत बाब आहे. त्यात अतिरेकी कारवाया करणाऱ्या देशाने नाक खुपसू नये. ते सहन केले जाणार आहे. पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले तरी आमच्या एकतेला धक्का पोहचू शकत नाही, असंही केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मतदानाचा दिवस जवळ येताच राजकीय टीका वाढल्या आहेत. भाजपकडून केजरीवाल यांना अतिरेकी संबोधण्यात आले आहे. तर केजरीवाल यांनी देखील भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहे.