‘आप’चा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार, अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 06:53 AM2023-11-27T06:53:38+5:302023-11-27T06:54:27+5:30

Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Arvind Kejriwal believes that every AAP worker is ready to make the supreme sacrifice for the country | ‘आप’चा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार, अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

‘आप’चा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार, अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

नवी दिल्ली  - आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना डिजिटल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. ते म्हणाले की, २०१२ मध्ये संविधान दिनीच आपण सर्वांनी मिळून आम आदमी पक्षाची स्थापना केली होती.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, या ११ वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले आणि अनेक अडचणींचा सामना केला. आज आपचा एक-एक कार्यकर्ता देश वाचवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार आहे. या ११ वर्षांत आपला जितके लक्ष्य करण्यात आले तितके देशाच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आले नाही. गेल्या ११ वर्षांत त्यांनी आमच्यावर २५०हून अधिक बनावट केसेस दाखल केल्या. ईडी, सीबीआय, आयटी, दिल्ली पोलिसांसह कोणतीही एजन्सी सोडली नाही. तरीही आजपर्यंत त्यांना आमच्याविरुद्ध हेराफेरीचा कोणताही पुरावा सापडलेला नाही आणि एक रुपयाही वसूल झालेला नाही. हे आमच्या प्रामाणिकपणाचे सर्वांत मोठे प्रमाणपत्र आहे.

ते म्हणाले की, आज माझे अंत:करण जड झाले आहे. हा पहिला स्थापना दिवस आहे जेव्हा मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि विजय नायर आमच्यासोबत नाहीत. त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकण्यात आले आहे. आजपर्यंत आमचा एकही आमदार किंवा नेता फुटला नाही. आम्ही भगतसिंग यांचे शिष्य आहोत. सत्याच्या मार्गावर चाललो आहोत. भारताला जगात नंबर एक देश बनवायचे आहे. आम्ही मरू; पण तडजोड करणार नाही. आज भारताचा संविधान दिन आहे. आजच्या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बनलेले देशाचे संविधान स्वीकारण्यात आले होते. 

देशाच्या कोनाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा 
nमुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आप हा भारताच्या इतिहासातील सर्वांत वेगाने वाढणारा पक्ष ठरला. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. या ११ वर्षांत जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे.
nजनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने दोन राज्यात सरकारे तर दोन राज्यात आमदार निवडून आले आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा आहे. 
 

Web Title: Arvind Kejriwal believes that every AAP worker is ready to make the supreme sacrifice for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.