"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:57 PM2024-05-17T16:57:49+5:302024-05-17T16:58:35+5:30
केजरीवाल म्हणाले, 'आपल्या देशात जी हुकूमशाही सुरू आहे, ती अस्वीकार्य आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत असा काळ कधीही बघितला नाही. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे.
मद्य घोटाळाप्रकरणी कारागृहातून पॅरोलवर बाहर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी, भारताची तुलना थेट रशियासोबत केली आहे. देशातील परिस्थिती अशी कधीच नव्हती. केंद्र सरकार विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांचे सचिव बिभव कुमार यांच्यावरच मारहाणीचा आरोप केला आहे.
पंजाबमध्ये प्रचारादरम्यान केजरीवाल म्हणाले, 'आपल्या देशात जी हुकूमशाही सुरू आहे, ती अस्वीकार्य आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत असा काळ कधीही बघितला नाही. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा उल्लेख करत, ते त्यांच्या विरोधकांना मारून टाकतात, असे म्हटले आहे.
केजरीवाल म्हणाले, 'जसे रशियात होते, एक तर पुतिन सर्व विरोधकांना कारागृहात टाकतात, अथवा त्यांना मरून टाकतात आणि निवडणुक घेतात आणि 87 टक्के मते मिळवतात. जर कुठला विरोधी पक्षच नसेल, तर केवळ तुम्हीच असाल, ज्यला, मतदान होईल'. यावेळी केजरीवाल यांनी सरकारवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डीएमकेला त्रास दिल्याचाही आरोप केला आहे.
मालीवाल प्रकरण -
दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष मालीवाल यांनी कुमार याच्यावर थापड आणि बुक्का मारल्याचा आरोप केला आहे. मालीवाल यांच्यासोबत केजरीवाल यांच्या निवासस्थानीच मारहण झाल्याचा आरोप आहे. महत्वाचे म्हणजे, घटना घडली तेव्हा केजरीवाल घरातच होते, असा दावाही करण्यात आला आहे.