भाजपची ‘वॉशिंग मशिन’ चौकात तोडणार; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल, मतदारांना १० गॅरंटीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 08:12 AM2024-05-13T08:12:01+5:302024-05-13T08:12:38+5:30

देशात ‘इंडिया’ आघाडीची सत्ता आल्यास भाजपच्या भ्रष्टाचाराची ‘वॉशिंग मशिन’ चौकात उभी करुन तोडू, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीतील दहा गॅरंटींची घोषणा केली. 

arvind kejriwal criticized bjp and announcement of 10 guarantees to voters for lok sabha election 2024 | भाजपची ‘वॉशिंग मशिन’ चौकात तोडणार; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल, मतदारांना १० गॅरंटीची घोषणा

भाजपची ‘वॉशिंग मशिन’ चौकात तोडणार; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल, मतदारांना १० गॅरंटीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात ‘इंडिया’ आघाडीची सत्ता आल्यास भाजपच्या भ्रष्टाचाराची ‘वॉशिंग मशिन’ चौकात उभी करुन तोडू, अशा शब्दात भाजपवर हल्ला चढवून आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चालू लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या दहा गॅरंटींची घोषणा केली. 

प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवणारा आणि भ्रष्टांना संरक्षण देणारा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा स्त्रोत भाजपची वॉशिंग मशिन आहे, अशी टीका करीत त्यांनी रविवारी दहा गॅरंटींची घोषणा केली. 

शेतकरी, बेरोजगार, जवानांसाठी नेमके काय करणार?

- देशात चोवीस तास वीजपुरवठा आणि देशातील सर्व गरीबांना मोफत वीज 
- देशातील १८ कोटी मुलांना उत्तम, दर्जेदार, मोफत शिक्षण
- देशात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य विम्याशिवाय मोफत उपचार
- लष्करभरतीसाठी सुरु केलेली अग्नीवीर योजना बंद करुन जवानांची भरती कायमीस्वरुपी करणार. 
- देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक तितका निधी खर्च करणार
- स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला पूर्ण भाव मिळवून देणार 
- सत्तेत आल्यास सर्वांगीण विकासासाठी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार  
- भाजपच्या भ्रष्टाचाराची वॉशिंग मशिन चौकात उभी करुन तोडणार 
- दरवर्षी देशातील दोन कोटी युवकांना रोजगाराचे साधन मिळवून देणार
- चीनला मागे टाकण्यासाठी व्यापार आणि उद्योगाला पूर्ण प्रोत्साहन
 

Web Title: arvind kejriwal criticized bjp and announcement of 10 guarantees to voters for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.