केजरीवाल अडचणीत, जेटली मानहानीप्रकरणी आरोप निश्चित

By admin | Published: March 26, 2017 08:51 AM2017-03-26T08:51:24+5:302017-03-26T08:51:24+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित

Arvind Kejriwal, facing allegations of defamation | केजरीवाल अडचणीत, जेटली मानहानीप्रकरणी आरोप निश्चित

केजरीवाल अडचणीत, जेटली मानहानीप्रकरणी आरोप निश्चित

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. केजरीवाल यांच्यासह आपच्या पाच नेत्यांवर दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. 
भ्रष्टाचाराव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये ‘दिल्ली अँड डिस्ट्रिक्टस क्रिकेट असोसिएशन’ (डीडीसीए) चे पदाधिकारी गुंतलेले आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवालांवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला.  एका वृत्तवाहिनीशी बोलताना केजरीवालांनी हा आरोप केला होता.  20 मे पासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात होणार आहे.
अरुण जेटलींच्या 13 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत डीडीसीए आर्थिक गैरव्यवहाराचं माहेरघर बनल्याचा मुख्य आरोप करण्यात आला होता, याशिवाय भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करुनही जेटलींनी कधीही कारवाई केली नाही. जेटलींच्या कारकीर्दीत डीडीसीएला फिरोजशहा कोटला स्टेडिअमसाठी नियम धाब्यावर बसवून परवानगी मिळाल्या असा आरोप करण्यात आला होता. 
केजरीवालांनी केलेल्या आरोपांमुळे डीडीसीएची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत, डीडीसीए आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले होते. दरम्यान, केजरीवालांच्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळल्याचं न्यायालयाने मान्य केलं होतं. त्यामुळे जेटलींवर केलेले आरोप केजरीवालांना आता चांगलीच महागात पडण्याची चिन्ह आहेत.

Web Title: Arvind Kejriwal, facing allegations of defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.