अरविंद केजरीवाल यांना जामीन, तिहारमधून आज सुटणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:35 AM2024-06-21T07:35:21+5:302024-06-21T07:36:10+5:30

केजरीवाल यांच्या नियमित जामिनासाठीच्या अर्जावर फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हा आदेश दिला.

Arvind Kejriwal gets bail will be released from Tihar jail today | अरविंद केजरीवाल यांना जामीन, तिहारमधून आज सुटणार!

अरविंद केजरीवाल यांना जामीन, तिहारमधून आज सुटणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मद्य धोरण प्रकरणी उद्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. या आदेशाला ४८ तासांसाठी स्थगिती देण्याची सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) विनंतीही न्यायालयाने फेटाळली. ते शुक्रवारी तिहार जेलमधून बाहेर येऊ शकतात.


विशेष न्यायाधीश निया बिंदू यांनी केजरीवाल यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिलासा दिला. केजरीवाल यांच्या नियमित जामिनासाठीच्या अर्जावर फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हा आदेश दिला. न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली होती.

Web Title: Arvind Kejriwal gets bail will be released from Tihar jail today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.