अरविंद केजरीवाल सरकारने पुन्हा जिंकला विश्वास, भाजपावर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 03:52 AM2022-09-02T03:52:32+5:302022-09-02T03:53:15+5:30

Kejriwal Government: भाजपने महाराष्ट्रासह अनेक राज्यांची सरकारे आमदारांची खरेदी करून पाडली. यासाठी ६३०० कोटी रुपये खर्च केले असून भाजपने आमदार खरेदीचे दुकान उघडल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत केला.

Arvind Kejriwal government wins trust again, makes serious allegations against BJP | अरविंद केजरीवाल सरकारने पुन्हा जिंकला विश्वास, भाजपावर केले गंभीर आरोप

अरविंद केजरीवाल सरकारने पुन्हा जिंकला विश्वास, भाजपावर केले गंभीर आरोप

googlenewsNext

- सुरेश भुसारी
नवी दिल्ली :  भाजपने महाराष्ट्रासह अनेक राज्यांची सरकारे आमदारांची खरेदी करून पाडली. यासाठी ६३०० कोटी रुपये खर्च केले असून भाजपने आमदार खरेदीचे दुकान उघडल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत केला. तसेच दिल्ली विधानसभेमध्ये आपने केजरीवाल सरकारवर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडून तो संमत केला. 

भाजपच्या आमदारांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली तसेच केजरीवाल सरकारच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. या गदारोळामुळे विधानसभेच्या उपाध्यक्ष राखी बिर्ला यांनी भाजपच्या तीन आमदारांना मार्शलांच्या माध्यमातून सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर भाजपच्या उर्वरित पाच आमदारांनी सभात्याग केला. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करण्यासाठी विरोधी पक्षाचा एकही आमदार सभागृहात नव्हता. 

भाजपने आमदार खरेदीचे दुकान उघडल्याचा आरोप करून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हे पैसे कुठून येतात? , असा सवाल केला. भाजप-आपमध्ये वाद सुरू आहे.

Web Title: Arvind Kejriwal government wins trust again, makes serious allegations against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.