"...तर अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचा धोका; वजनही झालं कमी"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:22 AM2024-07-15T11:22:29+5:302024-07-15T11:23:58+5:30

AAP Sanjay Singh And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या मेडिकल रिपोर्टवर आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया आली आहे. तिहार जेलमध्ये शुगर लेव्हल अनेक वेळा खाली गेल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे.

Arvind Kejriwal health AAP Sanjay Singh reaction on tihar jail medical report of delhi cm | "...तर अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचा धोका; वजनही झालं कमी"

"...तर अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचा धोका; वजनही झालं कमी"

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मेडिकल रिपोर्टवर आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया आली आहे. तिहार जेलमध्ये शुगर लेव्हल अनेक वेळा खाली गेल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे. शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे अरविंद केजरीवाल झोपेत कोमात जाऊ शकतात. तसेच यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही असतो. तिहार जेलच्या रिपोर्टनुसार, त्यांचं वजनही कमी झालं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वजनाबाबत आप नेते आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांचे साजे आठ किलो वजन कमी झाल्याचा दावा आप सरकारचे मंत्री, खासदार सातत्याने करत आहेत. यानंतर तिहार जेल सुपरिटेंडेंट यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वजनाबाबत सुरू असलेल्या दाव्यावर दिल्ली सरकारच्या गृह विभागाला पत्र लिहिलं आहे.

जेल सुपरिटेंडेंट यांच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल १ एप्रिल २०२४ रोजी पहिल्यांदा तिहार जेलमध्ये आले तेव्हा त्यांचे वजन ६५ किलो होतं. अरविंद केजरीवाल १० मे रोजी तिहार जेलमधून बाहेर पडले तेव्हा त्यांचं वजन ६४ किलो होतं. २ जून रोजी सरेंडर केलं तेव्हा त्यांचं वजन ६३.५ किलो होतं. सध्या त्यांचं वजन ६१.५ (१४ जुलै) किलो आहे.

कमी प्रमाणात अन्न खाल्ल्याने किंवा कमी कॅलरी घेतल्यानेही वजन कमी होऊ शकतं अशी माहिती जेल सुपरिटेंडेंट यांनी दिली आहे. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अरविंद केजरीवाल यांची दररोज तपासणी केली जाते. याशिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल याही मेडिकल  बोर्डशी सल्लामसलत करताना उपस्थित असतात.

दिल्ली सरकारचे काही मंत्री, एक विद्यमान खासदार आणि आम आदमी पक्षाच्या इतर आमदारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे निराधार आरोप केले आहेत. जेल प्रशासनाला घाबरवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे असं या पत्रात लिहिलं आहे. 
 

Web Title: Arvind Kejriwal health AAP Sanjay Singh reaction on tihar jail medical report of delhi cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.