अरविंद केजरीवाल सोडणार दिल्लीचे मुख्यमंत्रीपद ?

By admin | Published: January 10, 2017 05:04 PM2017-01-10T17:04:33+5:302017-01-10T17:18:03+5:30

राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबमधील 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.

Arvind Kejriwal leaves Delhi chief minister? | अरविंद केजरीवाल सोडणार दिल्लीचे मुख्यमंत्रीपद ?

अरविंद केजरीवाल सोडणार दिल्लीचे मुख्यमंत्रीपद ?

Next

ऑनलाइन लोकमत 

मोहाली, दि. 10 - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'आम आदमी पार्टी' मोठा डाव खेळत असल्याचे दिसत आहे. राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबमधील 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष सिसोदिया यांनी मोहालीतील सभेदरम्यान हा दावा केला आहे. 
 
सिसोदिया सभेतील भाषणादरम्यान म्हणाले की, 'तुम्ही असं समजा की पंजाबचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच बनणार आहेत. पंजाबचा मुख्यमंत्री कुणीही होवो, तरी जी आश्वासनं दिली जात आहेत ती पूर्ण करणं केजरीवाल यांची जबाबदारी आहे.' 'तुम्ही अरविंद केजरीवाल यांना मत देत आहात असं समजून मतदान करा', असेही पुढे सिसोदिया म्हणाले आहेत. 
(मोदींच्या मातृभेटीवरुन केजरीवालांनी उडवली खिल्ली)
(वादग्रस्त वक्तव्यासाठी साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस)
मनीष सिसोदिया यांनी केलेल्या या विधानावरुन 'आम आदमी पार्टी' पंजाब विधानसभा निवडणुकीच्या लढाईत केजरीवाल यांचे नाव वापरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.  तर दुसरीकडे, आगामी काळात केजरीवाल राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद खरंच सोडणार आहेत का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Web Title: Arvind Kejriwal leaves Delhi chief minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.