Arvind Kejriwal: 'भाजपला अरविंद केजरीवालांची हत्या करायची आहे', मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 04:48 PM2022-03-30T16:48:58+5:302022-03-30T17:27:44+5:30
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू होते, यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही आणि बॅरिकेडची तोडफोड करण्यासोबतच गेटवर लाल रंग लावला.
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर आज काही लोकंनी हल्ला केला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. 'काही समाजकंटकांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह बॅरीकेडची तोडफोड केली. या हल्ल्यामागे भाजपचा हात असून, भाजपला अरविंद केजरीवालांना ठार मारायचे आहे', असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
केजरीवाल की हत्या करवाना चाहती है बीजेपी! https://t.co/JnhCi41Oee
— Manish Sisodia (@msisodia) March 30, 2022
मनीष सिसोदिया यांचा भाजपवर आरोप
दरम्यान, या हल्ल्यानंतर आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर या हल्ल्याचा आरोप लावला आहे. 'भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली. भाजपच्या पोलिसांनी त्यांना थांबवण्याऐवजी दारापर्यंत आणले. पोलिसांची सुरक्षा असताना अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत कोणी पोहोचू कसे शकतात? हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडला. आम्हाला निवडणुकीत पराभूत करू शकले नाही, म्हणून आता केजरीवालांना मारायची योजना आखत आहेत, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे.
Punjab में AAP की जीत से बौखलाई BJP
— AAP (@AamAadmiParty) March 30, 2022
Delhi Police के साथ मिलकर किया CM @ArvindKejriwal पर जानलेवा हमला
BJP इतनी बौखला गई है कि केजरीवाल जी की हत्या की साज़िश रच रही है
BJP को डर है कि केवल केजरीवाल ही PM Modi को टक्कर दे सकते हैं इसलिए उन्हें जान से मारना चाहती है#BJPKeGundepic.twitter.com/xs28gozeS2
संजय सिंह यांचा इशारा...
आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही ट्विट करुन भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी लिहिले आहे की, 'लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना रोखण्याऐवजी दिल्ली पोलीस त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहेत. भाजपवाले लक्षात ठेवा, सर्वांचा हिशोब घेतला जाईल, ही लोकशाही आहे, इथे वेळ आल्यावर लोक तुम्हाला मतांच्या लाठ्या मारतील.'
नेमके काय घडले?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्याविरोधात भाजपकडून केजरीवालांविरोधात निदर्शने सुरू होते. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्हीसह अनेक वस्तुंची तोडफोड केली. 150 ते 200 कार्यकर्ते केजरीवालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी आले. 1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक 2 बॅरिकेड्स तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पोहोचले आणि घोषणाबाजी करू लागले. आंदोलकांसोबत एक पेंट बॉक्सही होता, त्यांनी निवासस्थानाच्या गेटवर लाल रंग फासला, बूम बॅरिअर आणि सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. यानंतर पोलिसांनी 70 जणांना ताब्यात घेतले.