Arvind Kejriwal in Punjab: मोफत वीजनंतर आता मोफत उपचार...केजरीवालांनी पंजाबसाठी उघडला आश्वासनांचा पेटारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 02:14 PM2021-09-30T14:14:17+5:302021-09-30T14:15:40+5:30

Arvind Kejriwal in Punjab: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे.

arvind kejriwal in punjab ludhiana health services guarantee attacks congress | Arvind Kejriwal in Punjab: मोफत वीजनंतर आता मोफत उपचार...केजरीवालांनी पंजाबसाठी उघडला आश्वासनांचा पेटारा

Arvind Kejriwal in Punjab: मोफत वीजनंतर आता मोफत उपचार...केजरीवालांनी पंजाबसाठी उघडला आश्वासनांचा पेटारा

Next

Arvind Kejriwal in Punjab: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे. यात पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आल्यानंतर जनतेला मोफत उपचार, औषधं आणि चाचण्यांचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासोबत केजरीवालांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार का? याबाबत विचारलं असता त्यांनी हा फक्त एक काल्पनिक प्रश्न असल्याचं केजरीवाल म्हणाले. 

केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला ६ महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. यात आरोग्य क्षेत्राशी संबंधीत मोठ्या घोषणांचा समावेश आहे. केजरीवालांनी केलेल्या घोषणांमुळे आता पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघणार आहे. पंजाब काँग्रेसला तोडीस तोड आव्हान देण्याची तयारी आम आदमी पक्षानं केली आहे. 

केजरीवालींनी दिलेली ६ महत्त्वाची आश्वासनं...
- पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीवर मोफत व उत्तम उपचार
- संपूर्ण उपचार, चाचण्या, औषधं मोफत देणार. शस्त्रक्रियेचा २० लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करणार
- पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला हेल्थकार्ड दिलं जाणार. यात एमआरआय, एक्स-रे इत्याही अहवाल सादर केले जातील. 
- पंजाबमध्ये मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर 'पिंड क्लिनिक' उभारले जाणार. याची एकूण संख्या १६ हजारांच्या आसपास असेल.
- पंजाबमधील सर्व शासकीय रुग्णालयांना अत्याधुनिक आणि स्वच्छ करणार. मोठ्या प्रमाणात नवी रुग्णालयं सुरू केली जाणार
- पंजाबमध्ये रस्ते अपघातातील अपघातग्रस्तांवर मोफत उपचार केले जाणार

पंजाबमध्ये सरकारचा तमाशा- केजरीवाल
"पाच वर्षांपूर्वी जेव्हा पंजाबमधील जनतेनं मोठ्या विश्वासानं काँग्रेसच्या हातात इथली सत्ता दिली होती. पण आज काँग्रेस काहीच काम करताना दिसत नाही. यांनी फक्त तमाशा सुरू केला आहे आणि खुर्चीसाठी घाणरडं राजकारण खेळलं जात आहे. त्यांच्यातील प्रत्येक नेत्याला आज मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे जनता त्रस्त झालीय", असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. 

Read in English

Web Title: arvind kejriwal in punjab ludhiana health services guarantee attacks congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.