अरविंद केजरीवालांना मिळाली बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षाव्यवस्थेत वाढ
By Admin | Published: March 31, 2016 01:09 PM2016-03-31T13:09:02+5:302016-03-31T13:10:26+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिल्यानंतर त्यांचे कार्यालय व निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर केजरीवाल यांचे कार्यालय व त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी आलेल्या या फोननंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणांचा कसून तपास केला असता तो एक बनावट कॉल असल्याचे सिद्ध झाले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालय व निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षात एक फोन आला. ' केजरीवाल यांना वाचवण्यासाठी जे करता येईल ते करा, मी तासाभराच्या आत त्यांना उडवेन' अशी धमकी अज्ञाताने फोनवरून दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अलर् जारी करत सचिवालय व केजरीवालाच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवली.
दरम्यान हा फोन नक्की कोणी केला याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.