लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा अरविंद केजरीवाल यांचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 08:27 PM2019-01-13T20:27:50+5:302019-01-13T20:32:45+5:30

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे.

Arvind Kejriwal will not fight against Narendra Modi in Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा अरविंद केजरीवाल यांचा निर्णय 

लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा अरविंद केजरीवाल यांचा निर्णय 

Next
ठळक मुद्दे2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना वाराणसी येथे आव्हान दिले होतेपण आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी  घेतला आहेअरविंद केजरीवाल हे सध्या केवळ दिल्लीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

लखनौ - लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना वाराणसी येथे आव्हान दिले होते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी  घेतला आहे. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी ही माहिती दिली. मात्र आप वाराणसी येथून मोदींविरोधात तगडा उमेदवार देणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले. 

अरविंद केजरीवाल यांच्या या निर्णयाबाबत माहिती देताना संजय सिंह यांनी सांगितले की, ''अरविंद केजरीवाल हे सध्या केवळ दिल्लीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत.''  मात्र आप वाराणसी येथून मोदींविरोधात तगडा उमेदवार देणार आहे, असेही संजय सिंह यांनी सांगितले. 

 2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षीत यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला होता. पण त्या निवडणुकीत केजरीवाल दुसऱ्या स्थानावर राहिले होते.  
दरम्यान, आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत मोजक्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आप दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदिगड येथील लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील काही जागांवरही आम आदमी पक्ष आपले उमेदवार देणार आहे. 

Web Title: Arvind Kejriwal will not fight against Narendra Modi in Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.