अरविंद केजरीवालांचं नाव कम्प्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे- ऋषी कपूर

By admin | Published: January 4, 2017 05:25 PM2017-01-04T17:25:04+5:302017-01-04T17:28:07+5:30

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून अरविंद केजरीवालांवर भडकले आहेत.

Arvind Kejriwal's name should be kept in the Complaint box - Rishi Kapoor | अरविंद केजरीवालांचं नाव कम्प्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे- ऋषी कपूर

अरविंद केजरीवालांचं नाव कम्प्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे- ऋषी कपूर

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल सोशल मीडियावर स्वतःच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे नेहमीच टीकेचे पात्र ठरतात. अनेक जण सोशल मीडियावरून त्यांची टिंगलटवाळीही करत असतात. सोशल मीडियावर त्यांना देशाचा एकुलता एक प्रामाणिक माणूस म्हणत त्यांच्या उपरोधिक टीकाही केली जाते. आता ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून अरविंद केजरीवालांवर भडकले आहेत.

मात्र, बुधवारी म्हणजे आज ज्यावेळी निवडणूक आयोगानं 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच अरविंद केजरीवालांनी नाराजी व्यक्त केली. तसेच गोवा आणि पंजाबच्या निवडणुकांची तारीख एक नसावी, असंही आप म्हणणं आहे.

दरम्यान आपच्या याच टीकेचं बोट पकडून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे. त्यांनी केजरीवालांवर राग व्यक्त करतानाच नेहमीच तक्रारी का करता, असा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. "तुमचं नाव मि. कम्प्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे. तुम्हाला केव्हाच आनंद होत नाही", असं म्हणत ऋषी कपूर यांनी अरविंद केजरीवालांवर टीका केली आहे.