अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ, AAP नेत्यांवर दाखल होणार एफआयआर; कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 20:26 IST2025-03-11T20:26:27+5:302025-03-11T20:26:49+5:30

Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवालांसह त्यांच्या पक्षाशी संबंधित इतर नेत्यांवर FIR दाखल करण्यात येणार आहे.

Arvind Kejriwal's troubles increase, FIR to be filed against AAP leaders; Court decision | अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ, AAP नेत्यांवर दाखल होणार एफआयआर; कोर्टाचा निर्णय

अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ, AAP नेत्यांवर दाखल होणार एफआयआर; कोर्टाचा निर्णय

Arvind Kejriwal News: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केजरीवालांसह त्यांच्या पक्षाशी संबंधित इतर नेत्यांवर FIR दाखल करण्यात येणार आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला आहे. अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या इतर नेत्यांवर सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे न्यायालयाने मान्य केले आहे.

न्यायालयाने द्वारका दक्षिण पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आणि एसएचओला 18 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी दंडाधिकारी न्यायालयाला निधीच्या गैरवापराच्या प्रकरणाची नव्याने सुनावणी करण्यास सांगितले होते. 

काय आहे प्रकरण?
2019 मध्ये न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत अरविंद केजरीवाल, आपचे माजी आमदार गुलाब सिंह आणि द्वारकाच्या नगरसेवक नितिका शर्मा यांनी परिसरात विविध ठिकाणी मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक पैशांचा जाणीवपूर्वक अपव्यय केल्याचा आरोप करण्यात आला होता. 

यापूर्वी जेव्हा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती, तेव्हा दंडाधिकारी न्यायालयाने ती फेटाळली होती. यानंतर तक्रारदाराने सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. सत्र न्यायालयाने हा खटला पुन्हा दंडाधिकारी न्यायालयाकडे पाठवला आणि दखलपात्र गुन्हा आहे की नाही हे ठरवण्यास सांगितले. यानंतर मंगळवारी पुन्हा न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली आणि अर्ज स्वीकारताना ‘आप’च्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, अरविंद केजरीवालांना यापूर्वी कथित मद्य घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना बराच काळ तुरुंगात राहावे लागले. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

Web Title: Arvind Kejriwal's troubles increase, FIR to be filed against AAP leaders; Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.