Arvind Kerjiwal : "केंद्र सरकार 8 वर्षांपासून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचतंय"; केजरीवालांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 01:28 PM2023-10-16T13:28:44+5:302023-10-16T13:39:58+5:30
Arvind Kerjiwal : अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकार गेल्या 8 वर्षांपासून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचत आहे. त्यासाठी अनेकांवर दबाव टाकण्यात आला. माझ्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. जे मान्य करत नव्हते त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याच्यावर विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत ट्विट केले आहे.
सीएम अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं की, ही 2015 ची घटना आहे. मोदी सरकार 2015 पासून मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकून त्यांना माझ्याविरोधात वक्तव्ये करण्यास सांगितले जाते. अनेकांवर अत्याचारही झाले. देशासाठी काम करण्याऐवजी पंतप्रधान 24 तास विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवण्यासाठी कट रचत असतात.
ये 2015 की घटना है। मोदी सरकार 2015 से मुझे झूठे केसों में फँसाने की कोशिश कर रही है। लोगों पर तरह तरह के दबाव बना कर उन्हें मेरे ख़िलाफ़ बयान देने के लिए कहा जाता है। कई लोगों को तो यातनाएँ भी दी गयीं।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 16, 2023
प्रधान मंत्री जी देश के लिए काम करने के बजाय 24 घंटे अपने विरोधियों को झूठे… https://t.co/kokYZVCD5s
आम आदमी पार्टीचे अनेक नेते तुरुंगात आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही तुरुंगात आहेत. याशिवाय नुकतेच आपचे खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. आपल्या नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
2013 मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं होतं. दोन वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या, तेव्हा आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. 2020 मध्ये तिसऱ्यांदा 'आप'ला मोठा विजय मिळाला. पंजाबमध्येही आपचं सरकार स्थापन झालं आहे. 2013 मध्ये स्थापन झाल्यानंतर 10 वर्षातच आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनला आहे. त्यांच्या पक्षाच्या झपाट्याने वाढ होत असल्याने भाजपा घाबरला असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.