कोण आहेत अरविंद पानगरिया, जाणून घ्या ५ गोष्टी !

By Admin | Published: July 12, 2016 06:44 PM2016-07-12T18:44:51+5:302016-07-12T18:50:35+5:30

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दुस-यांदा गव्हर्नर पदाची धुरा सांभाळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्यांचे उत्तराधकारी म्हणून अरविंद पानगरिया यांच्या

Arvind Panagarh, who are 5 Things! | कोण आहेत अरविंद पानगरिया, जाणून घ्या ५ गोष्टी !

कोण आहेत अरविंद पानगरिया, जाणून घ्या ५ गोष्टी !

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दुस-यांदा गव्हर्नर पदाची धुरा सांभाळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून अरविंद पानगरिया यांच्या नावाची चर्चा होत आहे. 
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपदी अरविंद पानगरिया यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सोमवारी सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, अद्याप केंद्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. याबाबत कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
 
-  63 वर्षीय अरविंद पानगरिया यांची जानेवारी २०१५ मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी ते कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते.
 
- प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी संपादन केली आहे. तसेच, त्यांनी दहा पुस्तकांचे स्वत: लेखन केले आहे. अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवंती यांचे चांगले निकटवर्तीय आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी India’s Tryst with Destiny: Debunking Myths that Undermine Progress and Addressing New Challenges चे लेखन केले आहे. 
 
- एशियन डेव्हलपमेंट बँक, आंतरराष्ट्रीय आर्थिक फंड, जागतिक व्यापार संघटना आणि संयुक्त राष्ट्र परिषद यामध्ये अरविंद पानगरिया यांनी मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहिले आहे. 
 
- अरविंद पानगरिया यांना 'सरकारचा माणूस' असे समजले जाते. गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर नजर टाकल्यास त्यांची स्तुती करण्यात येत होती. 
 
- भारत सरकारकडून मार्च २०१२ मध्ये अरविंद पानगरिया यांना पद्मभूषण या मानाच्या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. 

Web Title: Arvind Panagarh, who are 5 Things!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.