तीन वर्षांत येणार तब्बल ४०० ‘वंदे भारत’, ५० हजार कोटींचा खर्च; मेक इन इंडियाही सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 06:51 AM2024-01-10T06:51:32+5:302024-01-10T06:51:54+5:30

वंदे भारतच्या गतिशीलतेमुळे प्रवासवेळेत २५% बचत

As many as 400 'Vande Bharat' to come in three years, cost of 50 thousand crores; Make in India is also good | तीन वर्षांत येणार तब्बल ४०० ‘वंदे भारत’, ५० हजार कोटींचा खर्च; मेक इन इंडियाही सुसाट

तीन वर्षांत येणार तब्बल ४०० ‘वंदे भारत’, ५० हजार कोटींचा खर्च; मेक इन इंडियाही सुसाट

ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार पुढील तीन वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करणार आहे. पूर्णतः भारतीय बनावटीच्या ‘वंदे भारत 2.0’ श्रेणीतील सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे.

५० हजार कोटींचा खर्च

एक ‘वंदे भारत’ रेल्वे तयार करण्यासाठी किमान ११५ कोटींचा खर्च येतो. त्यानुसार पुढील ३ वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ सेवेत आणण्यासाठी जवळपास ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.

वैशिष्ट्येः

  1. ‘वंदे भारत २.०’मध्ये कमाल वेगमर्यादा १८० कि.मी. प्रतितास तसेच रेल्वेचे वजन ४३० टनांवरून ३९२ टनांपर्यंत कमी केले.
  2. नव्या ‘वंदे भारत’मध्ये कवच (अपघातविरोधी प्रणाली) सुविधेसह ६५० मि.मी.पर्यंतच्या पुराचा सामना करण्यास सक्षम अशी डब्याखालील इलेक्ट्रिक उपकरणे 
  3. पूर्वीच्या १४५ सेकंदांच्या तुलनेत नव्या श्रेणीत अवघ्या १४० सेकंदांत १६० प्रतितास वेग गाठण्याची क्षमता.


‘वंदे भारत 2.0’ सेवेत

नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेला १५ नोव्हेंबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर ‘वंदे भारत 2.0’ ही अद्ययावत सेवा ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई ते गांधीनगरदरम्यान सुरू झाली.

  • २५% - प्रवासवेळेत बचत
  • ४०% - इतर रेल्वेंच्या तुलनेत अधिक वेगवान
  • ३०% - रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीमुळे वीजवापरात बचत


‘वंदे भारत 2.0’मध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यांना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: As many as 400 'Vande Bharat' to come in three years, cost of 50 thousand crores; Make in India is also good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.