तब्बल 6 लाख आधार कार्डची रद्दी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:00 AM2022-07-26T06:00:44+5:302022-07-26T06:00:57+5:30
आधारकार्ड देशाचे नागरिक असल्याचे, तसेच इतर बाबींसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक कारणांसाठी ते मागितले जाते. मात्र, आता अनेक कारणांसाठी ...
आधारकार्ड देशाचे नागरिक असल्याचे, तसेच इतर बाबींसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक कारणांसाठी ते मागितले जाते. मात्र, आता अनेक कारणांसाठी बनावट आधार कार्डचा वापर वाढला असून, फसवणूक होत आहे. यामुळे यूआयडीएआयने कठोर कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत ६ लाख बनावट आधार कार्ड रद्दीत जमा केले आहेत.
‘ते’ झाले सक्रिय
डुप्लिकेट किंवा बनावट आधारकार्ड तयार करणारे देशात किती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत हे यूआयडीएआयने रद्द केलेल्या आधार कार्डच्या संख्येवरून लक्षात येईल.
आणखी कठोर कारवाई
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, यूआयडीएआयने ५ लाख ९८ हजार ९९९ पेक्षा अधिक डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केले असून, आणखी आधार कार्ड रद्द करण्याची कारवाई सुरू आहे.
आणखी कशासाठी वापर
चंद्रशेखर यांनी म्हटले की, आता पेन्शन व्हेरिफिकेशनसाठीही चेहऱ्याद्वारे होणारी आधार पडताळणी केली जात आहे. आतापर्यंत एक लाख पेन्शनधारक या तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत.
बनावट संकेतस्थळांना नोटीस
nडिजिटायझेशनच्या या जमान्यात डुप्लिकेट सर्टिफिकेटचा धंदा करून आपले खिसे भरत आहेत.
nवाढती प्रकरणे पाहता केंद्र आणि राज्य स्तरावर बनावट आधार कार्ड बनवणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली.
nया कारवाईचा एक भाग म्हणून यूआयडीएआयने आधारकार्डशी संबंधित सेवांचा दावा करणाऱ्या डझनभर बनावट वेबसाइटस्ना नोटीसही पाठवली आहे.
nत्यांना कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
चेहऱ्याद्वारे होणार आधार पडताळणी
nराज्यमंत्री चंद्रशेखर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बनावट आधार कार्ड बनवण्याच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, त्यावर आळा घालण्यासाठी अनेक आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत.
nयाअंतर्गत, आधार कार्डमध्ये एक अतिरिक्त व्हेरिफिकेशन वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा लवकरच आधार पडताळणीसाठी वापरला जाणार आहे. आतापर्यंत पडताळणीसाठी बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन घेतले जात होते.