बॅग उचलताच झाला धमाका! कोलकातामध्ये स्फोटात एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 05:07 PM2024-09-14T17:07:06+5:302024-09-14T17:09:13+5:30
Blast in Kolkata : कोलकातामध्ये स्फोट झाल्याची एक घटना घडली आहे. रस्त्यावर पडलेली बॅग उचलताना हा स्फोट झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, तपास सुरू केला आहे.
Kolkata Blast News : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये स्फोट झाला. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याला एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यक्तीने रस्त्यावर पडलेली थैली उचलल्यानंतर हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, शनिवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ब्लोचमॅन सेंट आणि एसएन बॅनर्जी रोडवर एक थैली ठेवण्यात आलेली होती. तिथून जात असलेल्या एका कचरा वेचणाऱ्याने ती उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्फोट झाला.
तलतला पोलीस स्फोट झालेल्या ठिकाणी पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव बपी दास (वय ५८) असे असून, त्याच्या एनआरएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटानंतर पोलिसांनी परिसर बंद केला आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. बीडीडीएस टीमलाही बोलवण्यात आले.
A blast occurred on S.N. Banerjee Road in central Kolkata, injuring a rag picker identified as Bapi Das (58). He was taken to NRS Medical College and Hospital with an injury to his right wrist.
— IANS (@ians_india) September 14, 2024
A plastic gunny bag was found at the scene. The BDDS team cleared the area after… pic.twitter.com/okpHWs1jJg
जो व्यक्ती या स्फोटात घायाळ झाला आहे, तो फूटपाथवरच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अद्याप जखमीचा जबाब नोंदण्यात आलेला नाही.