उत्तर प्रदेशात एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुस्लीम; ओवेसी यांचा योगींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:55 PM2021-03-15T15:55:48+5:302021-03-15T15:58:04+5:30

असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

asaduddin owaisi attacks on yogi govt over encounter | उत्तर प्रदेशात एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुस्लीम; ओवेसी यांचा योगींवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुस्लीम; ओवेसी यांचा योगींवर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देओवेसी यांचा योगी सरकारवर हल्लाबोलउत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम बांधवांवर अन्याय होत असल्याचा आरोपओवेसी यांच्या आरोपाला योगी सरकारमधील मंत्र्यांकडून प्रत्युत्तर

बलरामपूर : बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्ष मजबूत करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी आता हळूहळू उत्तर प्रदेशमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून, एका जनसभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (asaduddin owaisi attacks on yogi govt over encounter)

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून मुस्लीम बांधवांवर होणाऱ्या अन्यायात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. २०१७ ते २०२० या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या एन्काऊंटमध्ये मारल्या गेलेल्या एकूण लोकांपैकी ३७ टक्के मुस्लीम होते, असा दावा करत हा अन्याय का केला जातोय, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका

उत्तर प्रदेशात संविधानाची पायमल्ली

उत्तर प्रदेशातील योगी सरकार संविधानाची पायमल्ली करत असून, संविधान राज नाहीसे झाले आहे. योगी सरकारच्या अनेक नीती या मुस्लिमविरोधी आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत योगी सरकार पुन्हा बनणार नाही, असा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला. 

असदुद्दीन यांच्यावर पलटवार

असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या टीकेवर योगी सरकारमधील मंत्री मोहसिन रजा यांनी पलटवार केला आहे. ओवेसी यांनी मुस्लीम बांधवांना बॅरिस्टर होण्याचा सल्ला द्यावा, गुन्हेगार नाही. गुन्हेगारीमध्ये मुस्लीम बांधवांचा इतका जास्त हिस्सा का असतो, याबाबतही समाजाला मार्गदर्शन करावे, असा टोला रजा यांनी या मुद्यावर बोलताना लगावला. ओवेसी यांचे पूर्वज देशाचे विभाजन करणार आहेत. ओवेसी यांची भूमिका विभाजनवादी आहे, असा आरोपही रजा यांनी केला. 

दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही ओवेसी यांच्या आरोपांना उत्तर देत, जो जातीय राजकारण करतो, तोच अशा प्रकारची भाषा बोलतो. यातून यांचे गुन्हेगारीला समर्थन आहे, असा अर्थ निघतो, असे प्रत्युत्तर दिनेश शर्मा यांनी दिले.

Web Title: asaduddin owaisi attacks on yogi govt over encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.