Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:35 AM2022-10-06T05:35:53+5:302022-10-06T05:37:17+5:30

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.

asaduddin owaisi criticised rss chief mohan bhagwat over population control statement | Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

googlenewsNext

नवी दिल्ली: संपूर्ण देशात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. तर राजकीय पटलावरही दसरा सकाळपासून ते रात्रीपर्यंत चांगलाच गाजला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या विजयादशमी निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला आणि रात्री शिवसेनेचे शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे दसरा मेळावे अगदी दणक्यात झाले. मोहन भागवत यांच्या विधानांचा समाचार घेत एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. मोहन भागवतांचे विजयादशमीचे भाषण द्वेषपूर्ण होते. तसेच देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही, असे सांगत ओवेसी यांनी अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला.

कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे. मात्र आपला आत्मा काय आहे याबाबत नेतृत्व, नागरिक व समाजात स्पष्टता हवी. प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. लवचिकता ठेवावी लागते, असे सांगत मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केले होते. यावरून ओवेसी यांनी टीका केली आहे. 

देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही

असदुद्दीन ओवेसी यांनी एकामागून एक ट्विट करत, जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो. सध्या लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही. आम्ही रिप्लेसमेंट दर आधीच गाठला आहे. चिंतेची बाब म्हणजे आपली लोकसंख्या वृद्धत्वाकडे वेगाने चाललेली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. प्रजनन दरात सर्वांत वेगाने घट मुस्लिमांमध्ये दिसून आली आहे. मोहन भागवत दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने द्वेषपूर्ण भाषणे देतात. लोकांना वाढत्या लोकसंख्येची भीती दाखवतात. या भीतीमुळे नरसंहार, द्वेषाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. 

दरम्यान, भारताने गांभीर्याने विचारमंथन करून सर्वसमावेशक असे लोकसंख्या धोरण आणण्याची गरज आहे. लोकसंख्येमध्येही पुराव्यांचा समतोल असायला हवा. लोकसंख्येच्या असंतुलनाचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे पन्नास वर्षांपूर्वी घडले होते. पण आजही ते घडत आहे. पूर्व तिमोर नावाचा एक नवीन देश तयार झाला, दक्षिण सुदान नावाचा देश तयार झाला. कोसोवो झाला लोकसंख्येतील फरकामुळे नवे देश निर्माण झाले. देश फुटले. जन्मदर हा त्याचा देशाचा भाग आहे, पण बळजबरी, फसवणूक आणि लालसेमुळे होणारे धर्मांतर हा त्याचा मोठा घटक आहे. आणि जिथे सीमापार घुसखोरी होते तिथे घुसखोरीमुळे लोकसंख्येचा पॅटर्नही बदलतो. हा समतोल राखणे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: asaduddin owaisi criticised rss chief mohan bhagwat over population control statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.