लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या, ओवैसींचा भागवतांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 08:53 AM2020-01-19T08:53:33+5:302020-01-19T08:54:51+5:30
देशातली खरी समस्या लोकसंख्या नाही, तर बेरोजगारी असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत.
नवी दिल्लीः सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसींनी पलटवार केला. देशातली खरी समस्या लोकसंख्या नाही, तर बेरोजगारी असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत. संघाचे मोहन भागवत दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीच्या कायद्यावर बोलत आहेत. आतापर्यंत किती जणांना नोकरी दिली तेसुद्धा सांगा. वर्षं 2018मध्ये सरासरी 36 मुलांनी दररोज आत्महत्या केली आहे. त्यावर तुमचं मत काय?, असा प्रतिप्रश्नही ओवैसींनी भागवतांना विचारला. भारतात 60 टक्के लोकसंख्या ही 40 वर्षांहून कमी वयाच्या मुलांची आहे. त्यावर तुम्ही बोलत का नाही, असं म्हणत ओवैसींनी भागवतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुरादाबादमध्ये मोहन भागवत यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे, असं म्हटलं आहे. तसेच 'लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल. सध्या देशातील वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे, त्यासाठी दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा. लोकसंख्या नियंत्रणात येईल,' असं भागवत यांनी चर्चेदरम्यान म्हटलं आहे.
मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीने टीका केली. जबरदस्तीने नसबंदी करणार का? असं सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून नेहमीच भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करण्याचे आरोप केले जातात. सोशल मीडियावर सध्या मोहन भागवत भारताचे नवीन संविधान बनवत असल्याची एक पीडीएफ फाईल व्हायरल होऊ लागली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. भागवत नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. त्याची एक पीडीएफ फाईल बनवून व्हॉट्सअॅपवर फिरवण्यात येत आहे. या पीडीएफ फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे.Asaduddin Owaisi, AIMIM: RSS' Mohan Bhagwat Sahab said to make two child policy. Arrey tum naukriyan kitno ko diye wo bolo na. 36 bachche 2018 mein roz khudkhushi kiye, batao uspe kya kahenge aap?Bharat mein 60% abadi 40 saal se kam umr bachchon ki hai, unki baat nahi karenge. pic.twitter.com/DuSGeAdqoX
— ANI (@ANI) January 18, 2020