Asaduddin Owaisi:"काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ": असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:34 PM2022-06-02T19:34:42+5:302022-06-02T19:34:53+5:30
Asaduddin Owaisi: काश्मीर खोऱ्यात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गैर-मुस्लिम, विशेषत: काश्मिरी पंडितांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्याऐवजी नरेंद्र मोदी सरकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचा आरोप ओवेसींनी केला.
ओवेसी यांनी गुरुवारी या मुद्द्यावर ट्विट करत लिहिले, "काश्मीर खोऱ्यातून दुसऱ्यांदा स्थलांतर सुरू आहे आणि मोदी सरकार चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त. यासाठी पंतप्रधान कार्यालय जबाबदार आहे. सरकारकडून 1989 च्या चुकांची पुनरावृत्ती होत आहे," असे ओवेसी म्हणाले.
Just like 1987 assembly election was rigged; new delimitation has gerrymandered constituencies. BJP has only used Pandits for politics. They say “What about Pandits?!” only when questions are raised about their own history of riots. Pandits serve no other purpose for BJP 2/2
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 2, 2022
दुसर्या ट्विटमध्ये, ते म्हणतात, "1987 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे गोंधळ उडाला होता, नव्या परिसीमनातून फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने पंडितांचा वापर फक्त राजकारणासाठी केला. त्यांच्या काळातील दंगलींबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा ते म्हणतात - पंडितांचे काय? भाजपला पंडितांचा कळवळा नाही," असेही ते म्हणाले.
काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग वाढल्या
अलीकडच्या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची बँकेत घुसून हत्या केली. तो मूळचा राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता. यापूर्वी 31 मे रोजी एका शिक्षिकेची शाळेत घुसून आणि 25 मे रोजी एका सरकारी कर्मचाऱ्याची ऑफीसमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती.