UP Election 2022: “देशात मुस्लीम नाही, तर हिंदू व्होट बँक होती आणि कायम राहील”: असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 04:48 PM2021-11-01T16:48:49+5:302021-11-01T16:50:56+5:30

UP Election 2022: या देशात कोणतीच मुस्लीम व्होट बँक नव्हती, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

asaduddin owaisi said in india was is and will always be a hindu vote bank not a muslim | UP Election 2022: “देशात मुस्लीम नाही, तर हिंदू व्होट बँक होती आणि कायम राहील”: असदुद्दीन ओवेसी

UP Election 2022: “देशात मुस्लीम नाही, तर हिंदू व्होट बँक होती आणि कायम राहील”: असदुद्दीन ओवेसी

googlenewsNext

सहारनपूर: आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. भाजपविरोधात सर्व पक्ष अशी आताची राजकीय स्थिती पाहायला मिळत आहे. काही करून भाजपला सत्तेपासून खाली खेचण्याचा चंग विरोधकांनी बांधल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (एमआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. देशात मुस्लीम नाही, तर हिंदू व्होट बँक होती आणि कायम राहील, असे म्हटले आहे. 

सहारनपूर येथील एका जनसभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले की, भारतीय राजकारणात तुमचे एवढे महत्व राहिलेले नाही. तुमच्या मताचे, मुस्लिमांच्या मताचे आता एवढे महत्व राहिलेले नाही. आपल्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करण्यात आली की, मुसलमान एक व्होट बँक आहे. संसदेत उभे राहून ही गोष्ट सांगितली होती की, भारतात मुस्लीम व्होट बँक राहणार नाही. भारतात नेहमीच हिंदू व्होट बँक होती, आहे आणि राहील, असे ओवेसी यांनी सांगितले.

त्या सगळ्या जागांवर भाजपा कशी काय जिंकली?

सन २०१४ ची लोकसभा निवडणूक झाली. एमआयएम लढली नाही तरी पण मग भाजपा कशी काय जिंकली, असा सवाल करत त्यानंतर २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाली, एमआयएम २५-२७ जागांवर आणि भाजप ३०० जागांवर यशस्वी झाली. कोण जबाबदार? त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम लढली नाही. सपा आणि बसपा एकत्र लढले, केवळ १५ जागांवर यश मिळवले. मग सांगा त्या सगळ्या जागांवर भाजपा कशी काय जिंकली, अशी विचारणा ओवेसी यांनी केली. 

दरम्यान, जर कुणी विचारले की तुम्ही असे कसे म्हणता? व्होट बँकेचे राजकारण, व्होट बँकेचे राजकारण, नेहमी बोलले जाते की मुस्लीम व्होट मुस्लीम व्होट कुठेय मुस्लीम व्होट, जर मुस्लीम मते असती तर भारताच्या संसदेत केवळ २३-२४ खासदारच का जिंकून आले असते, नेहमीच या देशात कोणतीच मुस्लीम व्होट बँक नव्हती, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: asaduddin owaisi said in india was is and will always be a hindu vote bank not a muslim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.