UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:51 PM2021-09-09T12:51:09+5:302021-09-09T12:52:59+5:30

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली.

asaduddin owaisi said narendra modi became prime minister twice due to stupidity of mayawati and akhilesh yadav | UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

googlenewsNext

सुलतानपूर:उत्तर प्रदेशमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपसह अन्य पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठीही विविध पक्ष आघाडी, युती करत आहेत. तर, शेतकरी नेते भाजपविरोधी प्रचार करताना दिसत आहेत. यातच एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली असून, यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. (asaduddin owaisi slams mayawati and akhilesh yadav on narendra modi as a prime minister)

एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय; ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

असदुद्दीन ओवेसी यांनी अयोध्येतील रुदौली येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा प्रचार सुरू केल्यानंतर सुलतानपूर जिल्ह्यातील ओड्रा गावात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी एमआयएम पक्षाने राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात मते फोडल्याचे विराधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले.

शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली

सुलतानपूरमध्ये सर्वांनी अखिलेश यादव यांना भरभरून मते दिली तर तिथून भाजपाचे आमदार सूर्यभान सिंह कसे निवडून आले. तसेच २०१९ मध्येही लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली. तेव्हा तर मी निवडणूक लढवत नव्हतो. निवडणुकीनंतर अखिलेश यादव म्हणाले की हिंदूंनी मतदान न केल्याने मी हरलो असं न म्हणता, मुसलमानांनी मत न दिल्याचा आरोप केला. मुसलमान काय कैदी आहेत का, असा सवाल करत तसेच दोन्ही वेळा भाजपा मुस्लिमांच्या मतांनी जिंकली नाही, असे ओवेसी म्हणाले. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती या दोघांच्या चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले, अशी टीकाही त्यांनी केली. 

“या ५ प्रश्नांची उत्तर द्या, एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?”; भाजपचा पलटवार

आम्ही हरलो पण लाखो मते मिळवली

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने हैदराबाद, औरंगाबाद आणि किशनगंजमधून तीन जागा जिंकल्या. आम्ही हैदराबादमध्ये भाजपचा पराभव केला. मोदी आणि अमित शहा आम्हाला हरवायला आले होते, पण तरीही ते हरले. औरंगाबादमध्ये एमआयएमने शिवसेनेच्या खासदाराचा २१ वर्षांनी पराभव केला. किशनगंजमध्ये आम्ही हरलो पण आम्हाला लाखो मते मिळाली. मी जिथे लढतो तिथे भाजप जिंकत नाही. विधानसभा आणि संसदेत आवाज उठवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी असावा अशी आमची इच्छा आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्व आपल्या लोकांना निवडून पाठवू. सपा, बसपा आणि काँग्रेसने आतापर्यंत तुमचे खूप शोषण केले. आता हे थांबवायला हवे, या शब्दांत ओवेसी यांनी हल्लाबोल केला. 
 

Web Title: asaduddin owaisi said narendra modi became prime minister twice due to stupidity of mayawati and akhilesh yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.