CoronaVirus: “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:36 AM2021-05-11T11:36:16+5:302021-05-11T11:38:06+5:30
CoronaVirus: एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे.
नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावरून आता केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर टीका करताना वैज्ञानिकांच्या इशाऱ्याकडून दुर्लक्ष करुन सरकार झोपा काढत राहिल्याची टीका केली आहे. (asaduddin owaisi says scientists warned about 2nd corona wave will come but despite that the govt failed)
गेल्या सलग दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रावर टीका करत कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
“सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका
सरकार पूर्णपणे अपयशी ठरले
एएनआयशी बोलताना ओवेसी म्हणाले की, लसीकरण मोहिमेमध्ये केंद्राला अपयश आले आहे. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचा आणि लसींचा पुरवठा करण्यात केंद्राला अपयश आले. लसींच्या वितरणाचा हक्क केंद्राकडे राखीव असल्याने असे घडत आहे. वैज्ञानिकांनी दुसऱ्या लाटेसंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतरही सरकारने योग्य उपाययोजना, हालचाली केल्या नाहीत. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले, अशी टीका ओवेसी यांनी केली.
Centre failed in their vaccination policy, they failed in providing oxygen to state govts & UTs because the supply of vaccine is in the exclusive domain of union govt. They slept on their own scientists' warning that 2nd wave will come but despite that, the govt failed: Owaisi pic.twitter.com/yHggPl3a94
— ANI (@ANI) May 10, 2021
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी माफी मागावी
कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. पंतप्रधान संसद आणि पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात. मात्र, रुग्णालयांबद्दल ते कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, अशी मागणी ओवेसी यांनी यापूर्वी केली होती.
“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३,२९,९४२ नवे रुग्ण आढळून आले असून, ३,८७६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३७,१५,२२१ रुग्णांवर उपचार सुरू असून, गेल्या २४ तासांत ३,५६,०८२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १७ कोटी २७ लाख १० हजार ०६६ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.