पंतप्रधान ज्यांना भाऊ म्हणतात, त्यांनीच देशाला लुटले - ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 01:42 PM2018-02-25T13:42:20+5:302018-02-25T13:42:20+5:30

बाबरी मशिद प्रकरणावरुनही ओवेसी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टिका केली आहे

asadusddin-owaisi-said-we-will-make-our-mosque-on-the-disputed | पंतप्रधान ज्यांना भाऊ म्हणतात, त्यांनीच देशाला लुटले - ओवेसी

पंतप्रधान ज्यांना भाऊ म्हणतात, त्यांनीच देशाला लुटले - ओवेसी

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी ज्या लोकांना भाऊ म्हणतात, त्याच लोकांनी देशाला लुटले आहे, सध्या भारत देश हिंदुत्वाकडे जात आहे. आम्हाला मुस्लिम असल्याने दुसऱ्या वर्गातील नागरिक असल्यासारखी वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य  'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसींनी राजधानी दिल्लीमध्ये केले आहे. 

यावेळी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरून ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. गीतांजली जेम्सचे मालक मेहुल चोक्सी यांच्यासोबत काय संबंध आहेत? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की,  जे लोक आम्हाला पाकिस्तानी म्हणतात. त्यांना माझा सवाल आहे. हर्षद मेहता, केतन पारेख आणि नीरव मोदी हे मुस्लिम होते का?

बाबरी मशिद प्रकरणावरुनही ओवेसी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टिका केली आहे. अयोध्याच्या वादग्रस्त जागेवरील बाबरी मशिदीचा दावा आम्ही कधीच सोडणार नाही. आमची मशीद होती, आहे, आणि यापुढेही राहील, असं संवेदनशील वक्तव्य 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसींनी दिल्लीमध्ये केलं आहे. काल ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमात ओवेसी म्हणाले की, बाबरी मशीदप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय श्रद्धेच्या आधारावर नव्हे तर पुराव्याच्या आधारावर येईल. जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर बाबरी मशीद पुन्हा एकदा त्याच ठिकाणी उभी राहील.  काही लोक या प्रकरणी आम्हाला भीती दाखवत आहेत. आमच्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. ते आम्हाला दावा सोडायला सांगत आहेत. परंतु, मी त्यांना सांगतोय की, अयोध्याच्या वादग्रस्त जागेवरचा मशिदीवरचा दावा मुस्लिम कधीच सोडणार नाहीत. असे ओवेसी यांनी भाजपाचे नाव न घेता सुनावले. 

Web Title: asadusddin-owaisi-said-we-will-make-our-mosque-on-the-disputed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.