आसाराम- मृत साक्षीदाराचे कुटुंबीय दहशतीखाली

By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:55+5:302015-02-14T23:51:55+5:30

आसाराम- साक्षीदाराचे कुटुंबीय दहशतीखाली

Asaram: The deceased witness's family is in danger | आसाराम- मृत साक्षीदाराचे कुटुंबीय दहशतीखाली

आसाराम- मृत साक्षीदाराचे कुटुंबीय दहशतीखाली

googlenewsNext
ाराम- साक्षीदाराचे कुटुंबीय दहशतीखाली
१४ फेब्रुवारी २०१५

मृत साक्षीदाराचे कुटुंबीय दहशतीखाली
आसाराम बापू खटला : जोधपुरातील हल्ल्यानंतर पोलीस संरक्षण
मुजफ्फरनगर : आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार खटल्यातील आणखी एका साक्षीदारावर जोधपूरमध्ये न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्यात आल्याने आसाराम बापूविरुद्धच्या अन्य एका प्रकरणातील मृत साक्षीदाराचे कुटुंबीय दहशतीखाली वावरत आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले.
मुजफ्फरनगर जिल्ह्यात आसाराम बापूविरुद्ध चालू असलेल्या एका खटल्यात अखिल गुप्ता मुख्य साक्षीदार होता. ११ जानेवारीला त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचे मारेकरी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
गुप्ता यांचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आहेत. जोधपूर येथे आणखी एका साक्षीदारावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्ता यांच्या कुटुंबियांना संरक्षण देणे, हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे, असे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी काल शुक्रवारी या कुटुंबियांची भेट घेतली होती.
काल शुक्रवारी जोधपूर कोर्टातून बाहेर पडल्यानंतर साक्षीदार राहुल साचन पोलिसांच्या वाहनात बसत असताना त्याच्यावर धाडसी चाकू हल्ला करण्यात आला होता. अशा स्थितीत मयत अखिल गुप्ता यांचे वडील नरेश गुप्ता, आई दीपा आणि पत्नीची फौजदारी दंड संहितेतील कलम १६४ अन्वये दंडाधिकार्‍यांसमक्ष साक्ष नोंदविणे गरजेचे आहे.
आसाराम बापू यांचे सहकारी आम्हाला धमकावत आहेत. तसेच गुन्हेगारांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही, असा आरोप अखिलच्या कुटुंबियांनी केला आहे.
दरम्यान, नवी मंडी परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक कर्मवीर सिंह यांनी सांगितले की, अखिल यांच्या कुटंबियांना पूर्णत: संरक्षण देण्यात आले असून, चार पोलीस आणि पोलीस वाहनही परिसरात तैनात करण्यात आले आहे.
अखिल गुप्ता हा आसाराम बापूचा स्वयंपाकी व मदतनीस होता. गुप्ताच्या हत्येपूर्वी अमृत प्रजापती या आसाराम बापूच्या माजी सेवकाची गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरात येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Web Title: Asaram: The deceased witness's family is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.