भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढविण्यात ‘आशियान’ सहकार्य : सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:38 AM2019-11-12T04:38:51+5:302019-11-12T04:38:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आशादायी वातावरणामुळे भारत लवकरच पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करील,

ASEAN cooperation in shaping Indian economy: Singh | भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढविण्यात ‘आशियान’ सहकार्य : सिंह

भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढविण्यात ‘आशियान’ सहकार्य : सिंह

googlenewsNext

हरीश गुप्ता 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आशादायी वातावरणामुळे भारत लवकरच पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करील, असा विश्वास व्यक्त करून याकामी आशियान देशांसोबतच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असेल. ईशान्य विभागाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय ईशान्य विभाग विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण-पेन्शन, अणुऊर्जा राज्यमंत्री दोन दिवसांच्या भारत-आशियान व्यवसाय परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.
व्यवसायासाठी पूरक वातावरणासाठी संपर्क, दळणवळण आणि सुलभ नियम आवश्यक आहेत. ईशान्य भागाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, या भागातील संपर्क व्यवस्थेवर विद्यमान सरकारचे मुख्यत्वे लक्ष दिले आहे. त्यातहत सिक्कीमला मागच्या वर्षी पहिले विमानतळ मिळाले. इटानगरलाही लवकरच विमानतळ मिळाले. अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातील रेल्वे संपर्काचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आम्ही आगरतळा ते बांगलादेशदरम्यान पहिली ट्रेन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत. ब्रह्मपुत्र नदीच्या खालच्या भागात सरकारने विकसित करण्यात आलेल्या आंतदेर्शीय जलमार्गांचाही त्यांनी उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियान देशांसोबत दृढ संबंध करण्यावर भर देत आहेत, तसेच ईशान्य विभागाच्या विकासावरही त्यांचा भर आहे. ईशान्य विभागात विपुल क्षमता असून, त्याचा लाभ घेण्यात आलेला नाही. तेव्हा या क्षमतेचा लाभ घेण्याची गरज आहेत. भारताचे आशियान देशांसोबत संबंध दृढ आहेत. भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याकामी आशियान देशांसोबतच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असेल. आशियान देशांसोबतच्या सहकार्याला ईशान्य विभागाकडून गती मिळाली आहे, असे ते भाषणात म्हणाले.
ईशान्य भागातील पर्यटन क्षमतेबाबत बोलताना ते म्हणाले की, अलीकडच्या काही वर्षात येथील पर्यटन वाढले आहे. अरुणाचल प्रदेशात सरकार भारतीय चित्रपट आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करणार आहे. यावेळी रॉयल थाईचे राजदूत आणि आशियान संघटनेचे अध्यक्ष गाँगस्कदी यांनी भारतात व्यवसायासाठी उपलब्ध संधी जाणून घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
आशियान देशांत इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलँड, ब्रूनेई, लाओस, म्यान्मा, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे. भारत-आशियान व्यवसाय परिषदेत भारतातून दोनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

Web Title: ASEAN cooperation in shaping Indian economy: Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.