'काँग्रेसचं सरकार आल्यास आशा वर्कर्संना 10 हजार मानधन देणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 06:30 PM2021-11-10T18:30:01+5:302021-11-10T18:30:41+5:30
प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांनी कोरोना कालवधीत मोलाचं योगदान दिलंय.
लखनौ - काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी निवडणुकांपूर्व घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आल्यास आशा वर्कर आणि अंगणवाडी कार्यकर्ता यांना दरमहा 10 रुपये मानधन देण्यात येईल, असे आश्वासन प्रियंका यांनी दिले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून आशा वर्कर्स महिला भगिनींचा अपमान करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांनी कोरोना कालवधीत मोलाचं योगदान दिलंय. त्यामुळे, मानधनात वाढ मागणे हा त्यांचा हक्क आहे, सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं, ते सरकारचं कर्तव्य आहे. आशा वर्कर्स सन्मानाच्या हकदार आहेत, मी या लढाईत त्यांच्यासमवेत आहे. काँग्रेस पक्ष आशा वर्कर्स महिला भगिनींच्या सन्मानासाठी कटीबद्ध आहे. त्यामुळेच, राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास अंगणावाडी सेविका आणि आशा वर्कर्संना 10 हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी घोषणाच प्रियंका गांधींनी केली. दरम्यान, शाहजहांपूर येथे आपल्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी आशा वर्कर्स मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी, पोलिसांनी त्यांना अडवले.
उप्र सरकार द्वारा आशा बहनों पर किया गया एक-एक वार उनके द्वारा किए गए कार्यों का अपमान है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 10, 2021
मेरी आशा बहनों ने कोरोना में व अन्य मौकों पर पूरी लगन से अपनी सेवाएं दीं। मानदेय उनका हक है। उनकी बात सुनना सरकार का कर्तव्य।
आशा बहनें सम्मान की हकदार हैं और मैं इस लड़ाई में उनके साथ हूं। pic.twitter.com/fTmBSvJbQD
सप्टेंबर महिन्यात केली होती वाढ
अंगणवाडी कार्यकर्त्यांना मानधनासह प्रोत्साहनपर भत्ता म्हणून दरमहा 1500 रुपये, मिनी अंगणावाडी कार्यकर्त्यांना 1250 रुपये आणि अंगणवाडी सेविकांना 750 रुपये अधिक मिळणार आहेत. त्यामुळे, अंगणवाडी कार्यकर्ता म्हणजेच आशा वर्कर्संना 7000 रुपये मानधन निश्चित झालं आहे. तर, मिनी अंगणवाडी सेविकांसाठी 5500 मानधन होत असून आशा सेविकांना 4000 मानधन मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सप्टेंबर महिन्यात याबाबतची घोषणा केली होती.