'पिस्तुल पांडे' कोर्टासमोर शरण; म्हणाला, मिळाली होती जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 01:12 PM2018-10-18T13:12:16+5:302018-10-18T13:16:05+5:30

राजधानी नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडे याने कोर्टासमोर आत्मसमर्पण केले आहे.

ashish pandey surrender 5 star hotel in delhi patiala house court | 'पिस्तुल पांडे' कोर्टासमोर शरण; म्हणाला, मिळाली होती जीवे मारण्याची धमकी 

'पिस्तुल पांडे' कोर्टासमोर शरण; म्हणाला, मिळाली होती जीवे मारण्याची धमकी 

Next

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडे याने कोर्टासमोर आत्मसमर्पण केले आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात आशिष शरण आला. 
आशिष पांडे याने एका व्हिडीओच्या माध्यमातून आज सकाळी कोर्टासमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले. 


व्हिडीओमध्ये  म्हणाला आहे की, माझ्याजवळ परवाना असलेली पिस्तुल होती. मी माझ्या सुरक्षतेसाठी पिस्तुल बाहेर काढली होती. माझी राजकीय पार्श्वभूमी असणे गुन्हा आहे का? मी बिझनेस करतो. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास, यामध्ये कळेल की कोण धमकी देत होते. 




दरम्यान, आशिष पांडे याने ज्या कोर्टात आत्मसमर्पण केले आहे. येथील न्यायाधीश धर्मेंद्र सिंह यांची आज सुट्टी आहे. त्यामुळे हे प्रकरण अन्य कोर्टात पाठविले जाणार आहे.   


नेमके काय आहे प्रकरण?
नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर आशिष पांडेयनं पिस्तुलाच्या जोरावर एका जोडप्याला धमकी देत शिवीगाळ केली. शनिवारी (13 ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशिष पांडे हा बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या हातातील पिस्तुल दाखवत आशिष जोडप्याला धमकावत होता. आशिषसोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणी दिल्लीच्या आर. के. पुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: ashish pandey surrender 5 star hotel in delhi patiala house court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.