"मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून दिली महागाई"; इंधन दरवाढीवरून जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:29 AM2021-11-03T08:29:37+5:302021-11-03T08:31:40+5:30

Ashok Gehlot And Modi Government : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Ashok Gehlot took jibe at bjp said this time amrit mahotsav will be remembered for price of petrol diesel | "मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून दिली महागाई"; इंधन दरवाढीवरून जोरदार हल्लाबोल

"मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून दिली महागाई"; इंधन दरवाढीवरून जोरदार हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही काही शहरांमध्ये पेट्रोलची 110 रुपये अधिक दराने विक्री होत आहे. याच दरम्यान इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्र सरकार जोरदार हल्लाबोल करत आहेत. याच दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून ही महागाई दिली आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीत विक्रमी वाढ केल्याबद्दल कायम स्मरणात राहील. नरेंद्र मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून महागाई दिल्याचे दिसते" असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. तसेच "पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यतेल आणि भाज्यांच्या किमती ज्या प्रकारे वाढत आहेत, ते पाहता मोदी सरकारने जनतेला महागाईची दिवाळी भेट दिली आहे. आधीची सरकारे सणांच्या आधी महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत असत, जेणेकरून सर्वसामान्यांना सण आनंदाने साजरा करता यावा" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

"एवढे महाग पेट्रोल कसे विकत घ्यायचे?"

अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "दिवाळीच्या फक्त तीन दिवस आधी, मोदी सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती 266 रुपयांनी वाढवून मिठाई महाग करण्याची व्यवस्था केली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 116 रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 108 रुपये झाले आहेत, तर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर एका वर्षात 598 रुपयांवरून 305 रुपयांनी वाढले असून 903 रुपयांपर्यंत गेले आहेत" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "आमच्या सरकारने गुणवंत विद्यार्थिनींना महाविद्यालयात जाण्यासाठी स्कूटीचे वाटप केले, पण मुली मोदी सरकारला विचारत आहेत की एवढे महाग पेट्रोल कसे विकत घ्यायचे?" असंही गेहलोत म्हणाले.

"नरेंद्र मोदींच्या दाढीप्रमाणे वाढतेय महागाई; लोकांच्या ताटातील पदार्थ होताहेत कमी"  

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ (Kamalnath) यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) बोचरी टीका केली आहे. कमलनाथ यांनी वाढत्या महागाईची तुलना थेट पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली आहे. राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कमलनाथ बुरहानपुरला पोहोचले होते, यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. "जे लोक दिल्लीत दाढी वाढवून बसले आहेत, जसजसे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की त्यांची दाढी एक इंच वाढते. महागाई आता एवढी वाढली आहे की, त्याचा परिणाम आता जनतेच्या ताटात दिसून येत आहे. लोकांच्या ताटातील पदार्थ कमी कमी होत आहेत" असं म्हणत कमलनाथ यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. 

Web Title: Ashok Gehlot took jibe at bjp said this time amrit mahotsav will be remembered for price of petrol diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.