अशोक टॉकीजला आग
By admin | Published: October 30, 2015 11:56 PM2015-10-30T23:56:25+5:302015-10-30T23:56:25+5:30
शॉर्ट सर्किट ; एक लाखाचे नुकसान, तीन बंबाद्वारे विझविली आग
Next
श र्ट सर्किट ; एक लाखाचे नुकसान, तीन बंबाद्वारे विझविली आगजळगाव:शॉर्ट सर्कीटमुळे अशोक टॉकीजला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता घडली. यात वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. यात एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणीही तक्रार दिलेली नव्हती.शुक्रवारी साडे आठ वाजता चित्रपटाचा शो सुटल्यानंतर सभागृहातील लाईट सुरु होताच भिंतीवर शॉर्ट सर्किट झाले. सभागृहातून गर्दी बाहेर पडे पर्यंत हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही. नंतर मात्र ही आग पडद्यापर्यंत पोहचल्यावर कर्मचार्यांना हा प्रकार समजला. त्यांनी लागलीच व्यवस्थापक अशोक चव्हाण यांना सांगितला. त्यामुळे सर्व कर्मचार्यांनी सभागृहात धाव घेतली. अग्निशमन दलाशी संपर्क साधून तातडीने तीन बंब मागविण्यात आले.घटना समजातच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे, सहायक निरीक्षक दीपक गंधाले व कर्मचार्यांनींही घटनास्थळ गाठले. आग विझविल्यानंतर सभागृहात पाहणी करण्यात आली. या आगीत भींतीवरील वायरींग, लाकडी वस्तू व पडदे जळाले आहेत. खुर्च्यांचे मात्र कोणतेच नुकसान झालेले नाही.धावपळ अन् गोंधळअशोक टॉकीजला आग लागल्याचे समजताच प्रचंड गोंधळ उडाला. बारीक गल्लीत हे चित्रपटगृह असल्याने सुरुवातीला पळापळही झाली. दाट वस्तीमुळे अग्निशम दलाचे बंबांना घटनास्थळावर पोहचण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.या घटनेबाबत पोलिसांनी व्यवस्थापकाला तक्रार देण्याची समज दिली, परंतु रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते.