आत्मनिर्भर भारत! लवकरच स्वदेशी पेट्रोल आणणार; इंधन दरवाढीवर भाजप मंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 11:59 AM2021-02-21T11:59:52+5:302021-02-21T12:01:53+5:30

सलग १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे (Petrol Diesel Price Hike ) एकीकडे सामान्य जनता त्रस्त झालेली असताना दुसरीकडे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. विरोधकांकडून केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका होत आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी अजब दावा केला आहे. आगामी काळात स्वदेशी पेट्रोल आणण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

ashwini kumar choubey says soon we will have our own swadeshi petrol | आत्मनिर्भर भारत! लवकरच स्वदेशी पेट्रोल आणणार; इंधन दरवाढीवर भाजप मंत्र्याचा दावा

आत्मनिर्भर भारत! लवकरच स्वदेशी पेट्रोल आणणार; इंधन दरवाढीवर भाजप मंत्र्याचा दावा

Next
ठळक मुद्देभाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याचे अजब तर्कटभारतातच पेट्रोल निर्मिती करण्याची तयारी सुरू असल्याचा दावाविरोधकांना समाजकल्याणाची कामे दिसत नसल्याचा आरोप

नवी दिल्ली : सलग १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे (Petrol Diesel Price Hike ) एकीकडे सामान्य जनता त्रस्त झालेली असताना दुसरीकडे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. विरोधकांकडून केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका होत आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी अजब दावा केला आहे. आगामी काळात स्वदेशी पेट्रोल आणण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. (ashwini kumar choubey says soon we will have our own swadeshi petrol)

केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांना पत्रकारांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत विचारण्यात प्रश्न विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून अनेक गोष्टींच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. आताच्या घडीलाही वाढती महागाई नियंत्रणात आणण्यावर काम सुरू असून, सामान्य जनतेला दिलासा देण्यावर सरकारचा भर आहे. जागतिक पातळीवरील किमती केंद्र सरकारच्या अखत्यारित येत नाहीत किंवा त्या केंद्राकडून निश्चित केल्या जात नाहीत. विरोधकांना देशवासीयांच्या कल्याणासाठी सुरू असलेली कामे दिसत नाहीत, असा आरोप अश्विनी कुमार चौबे यांनी यावेळी बोलताना केला. 

धक्कादायक! देशात तब्बल ७,६८४ प्रकारचे कोरोना; सर्वाधिक प्रकार दक्षिण भारतात

स्वदेशी पेट्रोल आणण्यासाठी प्रयत्नशील

जागतिक बाजारातील कच्च्चा तेल्याच्या किमतींमुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. आता देशातच पेट्रोलची निर्मिती कशी होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात भारतात तयार झालेले पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध तयार करण्यात येईल. लवकरच देशवासीयांना स्वदेशी पेट्रोल मिळेल, असा दावा अश्विनी कुमार यांनी केला. इंधन दरवाढ आणि गॅसच्या वाढत्या किमतींवरून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

दरम्यान, सलग १२ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. देशभरात पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महागले. भोपाळमध्ये डिझेलने ८९.२३ रुपयांची आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९७ रुपये झाले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८८.०६ रुपये मोजावे लागत आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे. 

Web Title: ashwini kumar choubey says soon we will have our own swadeshi petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.