भारतातील 'या' शहरात उघडला आशियातील पहिला कॅफे, जिथे HIV पॉझिटिव्ह लोक करतायेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:57 AM2022-04-08T11:57:42+5:302022-04-08T11:59:12+5:30

Cafe Positive : एचआयव्ही पॉझिटिव्ह स्टाफद्वारे (HIV positive staff) चालवले जाणारे हे आशियातील पहिले कॅफे आहे.

asia first cafe with hiv positive staff opens in kolkata | भारतातील 'या' शहरात उघडला आशियातील पहिला कॅफे, जिथे HIV पॉझिटिव्ह लोक करतायेत काम

भारतातील 'या' शहरात उघडला आशियातील पहिला कॅफे, जिथे HIV पॉझिटिव्ह लोक करतायेत काम

Next

कोलकाता : एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) लोकांना नोकरी मिळणे खूप कठीण असते. त्यामुळे अशा काही संस्था आणि संघटना आहेत, ज्या एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. असाच एक कॅफे कोलकात्यात उघडण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कॅफेत काम करणारे सर्व कर्मचारी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह स्टाफद्वारे (HIV positive staff) चालवले जाणारे हे आशियातील पहिले कॅफे आहे.

दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, या कॅफेला नाव 'कॅफे पॉझिटिव्ह' असे देण्यात आले आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी जागरुकता निर्माण करणे आणि रोजगार निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. हा कॅफे आनंदघर  (Anandghar) स्वयंसेवी संस्था चालवते. कल्लोल घोष यांनी 'कॅफे पॉझिटिव्ह'ची स्थापना केली आहे. दरम्यान, आनंदघर स्वयंसेवी संस्था ही अपंग मुले आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी काम करते.

फ्रँकफर्टच्या कॅफेपासून प्रेरणा  
कल्लोल घोष यांनी सांगितले की, त्यांना फ्रँकफर्टमधील  (Frankfurt) एका कॅफेपासून प्रेरणा मिळाली, जी पूर्णपणे एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक चालवतात. ज्या ठिकाणी हा कॅफे उघडला आहे, ते ठिकाण कॉफी आणि सँडविचसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बहुतांश वेळा नोकरदार लोकांची व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते.

30 कॅफे उघडण्याची योजना
याचबरोबर, भारतात (India) अशाप्रकारचे 30 कॅफे उघडण्याची योजना आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षणासाठी 800 जणांची निवड केली आहे, असे कल्लोल घोष यांनी म्हटले आहे. तर सुरुवातीला कॅफे उघडताना तो चालणार नाही अशी भीती होती. मात्र, आता लोक यायला लागले आहेत. येथे काम करणारे लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यावर काही थांबतात तर काही निघून जातात, असेही कल्लोल घोष यांनी सांगितले. 

Read in English

Web Title: asia first cafe with hiv positive staff opens in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :HIV-AIDSएड्स