आसाममध्ये विषारी दारूमुळे 69 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:00 PM2019-02-23T12:00:54+5:302019-02-23T12:24:46+5:30
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 69 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुवाहाटी - आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 69 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने अनेकांची अचानक तब्येत बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 69 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच दारूचे नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. विषारी दारू ही शहराच्या बाहेरून आणली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचार्यांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
#Assam: Death toll due to consumption of spurious liquor in Assam's Golaghat & Jorhat districts has gone up to 69; DSP Golaghat (Pic 4) says, "Excise department has started an investigation."; Visuals from Golaghat pic.twitter.com/iIOSWc560Y
— ANI (@ANI) February 23, 2019
विषारी दारूमुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये 92 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने याआधी तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. सहारनपूरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील 36 जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. विषारी दारूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहारनपूरच्या 18 लोकांचा उपचारादरम्यान मेरठमध्ये मृत्यू झाला होता. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू असे प्रशासनाने सांगितले आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी छापे मारुन आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून बेकायदा दारू मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली होती.
Assam Excise Department: Official death toll due to consumption of spurious liquor in Golaghat & Jorhat districts has gone up to 69. pic.twitter.com/M8Yaex36Kh
— ANI (@ANI) February 23, 2019
उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांनी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली आणि बेकायदेशीर दारू विक्री विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असणाऱ्या व्यक्तींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली. तसेच याप्रकरणी अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.