जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:54 AM2021-07-06T10:54:07+5:302021-07-06T10:57:09+5:30

Assam CM : कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी (Encounter Policy) योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मत.

assam cm himanta biswa sarma law and order encounter policy meeting with all police station | जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Next
ठळक मुद्देकायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मतराज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह पार पडली बैठक

आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी (CM Himanta Biswa Sarma) कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं मोठं वक्तव्य केलं. तसंच महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांच्याविरोधात कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिली. सोमवारी सर्व पोलीस स्थानकांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

"काही लोकांनी मला सांगितलं की आजकाल गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढत आहे आणि एन्काऊंटरसारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे एक पॅटर्न बनत आहे का?, मी त्यांना हे पोलिसिंग पॅटर्न असायला हवं असं म्हटलं," असं वक्तव्य सरमा यांनी केलं. "बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगारानं पळ ठोकला आणि पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल. परंतु छातीवर नाही आणि कायद्यानं म्हटलं आहे, तुम्ही पायावर गोळी मारू शकता. आम्हाला आसाम पोलिसांना देशातील सर्वत्कृष्ठ सघटना बनवायची आहे," असंही ते म्हणाले. 

पशूंच्या तस्करीवर भाष्य 
"गाय आमची माता आहे. ती आम्हाला दुध देते, गोबर देते. ट्रॅक्टर येण्यापूर्वी आम्ही त्यांच्या मदतीनं शेती केली होती आणि आजही ते प्रकार अनेक राज्यांमध्ये सुरू आहेत. परंतु आता लोक पशूंची तस्करी, अंमली पदार्थांच्या तस्करीतही सामील झाले आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही सोडलं जाणार नाही," असंही ते म्हणाले. 

Web Title: assam cm himanta biswa sarma law and order encounter policy meeting with all police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.