आसाम काँग्रेसचे नऊ आमदार बडतर्फ
By admin | Published: October 4, 2015 11:33 PM2015-10-04T23:33:04+5:302015-10-04T23:33:04+5:30
बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने रविवारी आसाममधील आपल्या नऊ आमदारांना पक्षातून बडतर्फ केले.
गुवाहाटी : बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने रविवारी आसाममधील आपल्या नऊ आमदारांना पक्षातून बडतर्फ केले. या आमदारांच्या बडतर्फीचा आदेश आठवडाभरात जारी केला जाईल.
‘पक्षाच्या नऊ आमदारांना बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपात बडतर्फ करण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीने घेतला आहे. याबाबतचा आदेश आठवडाभरात जारी केला जाईल,’ असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अंजान दत्ता यांनी सांगितले. या नऊपैकी पाच आमदारांना आॅगस्टमध्येच निलंबित करण्यात आले होते, तर पाच आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. आम्ही आमचा निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्षाला कळवू. त्यानंतर या आमदारांचे काय करायचे हे विधिमंडळ पक्ष ठरवेल, असे दत्ता म्हणाले. (वृत्तसंस्था)