आसाममध्ये विजेची तार पडून ११ ठार
By admin | Published: April 12, 2016 01:48 AM2016-04-12T01:48:58+5:302016-04-12T01:48:58+5:30
पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला असता गोळ्या लागून उच्चदाब (हाय टेन्शन) असलेली विजेची तार कोसळून ११ निदर्शक ठार तर २० जण गंभीररीत्या
तीनसुकिया (आसाम) : पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला असता गोळ्या लागून उच्चदाब (हाय टेन्शन) असलेली विजेची तार कोसळून ११ निदर्शक ठार तर २० जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
तीन दिवसांपूर्वी दोघांची हत्या करणाऱ्या तिघांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत हाती धारदार चाकू आणि लाठ्या घेतलेल्या जमावाने तीनसुकिया जिल्ह्णातील पानगेरी पोलीस ठाण्याला घेराव घालत दगडफेक केल्यामुळे तणाव निर्माण झाला.
दगडफेकीत पोलीस ठाण्यातील खिडक्यांची तावदाने फुटली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी हवेत गोळीबार केला असता उच्चदाब असलेल्या विजेच्या तारांना गोळ्या लागल्या. विजेची तार कोसळताच नऊ जण जागीच ठार झाले तर दोन जण रुग्णालयात दगावले. (वृत्तसंस्था)