Assam NRC Final List 2019: आसाममधील एनआरसीची शेवटची यादी प्रसिद्ध, 19 लाख जण बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 10:36 AM2019-08-31T10:36:09+5:302019-08-31T10:48:29+5:30
Assam NRC List: आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी सकाळी प्रसिद्ध झाली आहे.
गुवाहाटी - आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी सकाळी प्रसिद्ध झाली आहे. एनआरसीच्या अंतिम यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 06 हजार 657 जणांना या यादीमधून बाहेर करण्यात आले आहे. दरम्यान, एनआरसीच्या अंमित यादीनंतरही ज्यांचे समाधान झाले नसेल, अशा व्यक्ती फॉरिनर ट्रायब्युनलसमोर आपले अपील दाखल करू शकतील.
Assam: Final list of National Register of Citizens (NRC) has been published. pic.twitter.com/iICYAfwrbF
— ANI (@ANI) August 31, 2019
एनआरसीचे स्टेट कोऑर्डिनेटर प्रतीक हजेला यांनी सांगितले की, ''आसाममधली 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना एनआरसीच्या शेवटच्या यादीत स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 6 हजार 657 जणांना या अंतिम यादीत स्थान देण्यात आलेले नाही. या निर्णयाबाबत जे संतुष्ट नसतील ते फॉरिनर ट्रायब्युनलसमोर अपील करू शकतात.''
Prateek Hajela,State Coordinator,NRC: A total of 3,11,21,004 persons found eligible for inclusion in final NRC leaving out 19,06,657 persons including those who did not submit their claims.Those not satisfied with outcome can file appeal before Foreigners Tribunals. (file pic) https://t.co/HfgIsjZ6lr https://t.co/A73ATaijTC
— ANI (@ANI) August 31, 2019
दरम्यान, एनआरसीची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होत असल्याने आसाममध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 51 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
या यादीमध्ये अनेकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांवर अन्याय होऊन प्रसंगी घुसखोरांनाही या यादीत स्थान मिळू शकते, अशी भीती भाजप, काँग्रेस, ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट आदी पक्षांनी एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी व्यक्त केली होती. मात्र या प्रक्रियेला ऑल आसाम स्टुडंटस् युनियनने पाठिंबा दिला आहे.