आसाममध्ये १८ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा

By Admin | Published: August 23, 2015 11:27 PM2015-08-23T23:27:56+5:302015-08-23T23:27:56+5:30

आसामातील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यांच्या १८ जिल्ह्यांतील सुमारे ६.५० लाख लोक

Assam has hit 18 districts for the first time | आसाममध्ये १८ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा

आसाममध्ये १८ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा

googlenewsNext

गुवाहाटी : आसामातील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यांच्या १८ जिल्ह्यांतील सुमारे ६.५० लाख लोक विस्थापित झाले असून, पूरबळींची संख्या वाढून १३ वर पोहोचली.
एका अधिकृत माहितीनुसार, धुबरी, गोलपाडा, चिरांग, कोक्राझार, बोंगाईगाव जिल्ह्णांत स्थिती चिंताजनक आहे. सुमारे १२९१ गावे पुराने वेढली असून, या गावांमधील सुमारे ६.५० लाख लोकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे. गत २४ तासांतील अतिवृष्टीमुळे कोक्राझार जिल्ह्णात दोघांचा बळी गेला, तर धुबरी जिल्ह्णातील राष्ट्रीय महामार्ग ३१ वर दोघांनी आपला जीव गमावला. आतापर्यंत कोक्राझारमध्ये चार, लखीमपूरमध्ये आणि धुबरी जिल्ह्णांत प्रत्येकी चार, बोंगाईगावात, बकसा, सोनीतपूर, चिरांग या जिल्ह्णांत प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. सुमारे २६० मदत शिबिरांमध्ये १.७९ लाख लोकांनी आश्रय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांची हवाई पाहणी
आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी रविवारी कोक्राझार, चिरांग, बोंगाईगाव आदी पूरप्रभावित भागांची हवाई पाहणी केली.

Web Title: Assam has hit 18 districts for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.