Assam Meghalaya Border Clash: असाम-मेघालय बॉर्डरवर गोळीबारानंतर हिंसाचार, 6 जणांचा मृत्यू, इंटरनेट बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 04:03 PM2022-11-22T16:03:25+5:302022-11-22T16:03:32+5:30

Meghalaya News: या घटनेत मेघालयातील पाच आणि असाममधील एका फॉरेस्ट गॉर्डचा मृत्यू झाला आहे.

Assam Meghalaya Border Clash: Assam-Meghalaya border violence after firing, 6 dead, internet shut down | Assam Meghalaya Border Clash: असाम-मेघालय बॉर्डरवर गोळीबारानंतर हिंसाचार, 6 जणांचा मृत्यू, इंटरनेट बंद

Assam Meghalaya Border Clash: असाम-मेघालय बॉर्डरवर गोळीबारानंतर हिंसाचार, 6 जणांचा मृत्यू, इंटरनेट बंद

Next

Assam Meghalaya Border Clash:आसाम-मेघालय सीमेवर मंगळवारी (22 नोव्हेंबर) सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लाकूड तस्करी करणारा ट्रक थांबवला होता, यानंतर हाणामारी झाली आणि वनरक्षकासह सहा जण ठार झाले. या घटनेनंतर मेघालय सरकारने 7 जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा पुढील 48 तासांसाठी बंद केली आहे.

मेघालयातील पश्चिम जयंतिया हिल्स, पूर्व जयंतिया हिल्स, पूर्व खासी हिल्स, री-भोई, पूर्व पश्चिम खासी हिल्स, पश्चिम खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्समध्ये इंटरनेट बंद केले आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी सांगितले की, या घटनेत मेघालयातील पाच आणि आसाममधील एका वनरक्षकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेघालयचे मुख्यमंत्री काय म्हणाले
कॉनराड संगमा म्हणाले की, मेघालय पोलिसांच्या वतीने एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. मी या घटनेबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो असून त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली यांनी पीटीआयला सांगितले की, आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे तीनच्या सुमारास मेघालय सीमेवर ट्रक अडवला होता.

ट्रक न थांबल्याने गोळीबार झाला
त्यांनी सांगितले की, ट्रक थांबला नाही तेव्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर गोळीबार केला आणि त्याचे टायर पंक्चर केले. चालक, त्याचा एक सहाय्यक आणि अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले, तर अन्य एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. अली यांनी सांगितले की, वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी या घटनेची माहिती जिरिकेंडिंग पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी गर्दी जमली
यानंतर घटनास्थळी जमाव जमा झाला आणि अटक केलेल्या लोकांना सोडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जमावाने वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांना घेराव घातला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना गोळीबार करावा लागला. या घटनेत वनविभागाच्या एका होमगार्डचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. वन कर्मचारी विद्यासिंग लेखे यांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Assam Meghalaya Border Clash: Assam-Meghalaya border violence after firing, 6 dead, internet shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.