आसामचा नवा कर्णधार
By Admin | Published: May 20, 2016 09:03 AM2016-05-20T09:03:46+5:302016-05-20T09:16:01+5:30
ईशान्येत भाजपाच्या पहिल्या सरकारचे कर्णधार होणारे सर्वानंद सोनोवाल यांनी गेल्या 15 वर्षापासून राज्यात सत्तारूढ गोगोईंच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारला पदच्युत केले.
>पंधरा वर्षानी झाले सत्तांतर
गुवाहाटी : ईशान्येत भाजपाच्या पहिल्या सरकारचे कर्णधार होणारे सर्वानंद सोनोवाल यांनी गेल्या 15 वर्षापासून राज्यात सत्तारूढ गोगोईंच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारला पदच्युत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास कायम राखला आहे. मोदींनीच केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्री तसेच आसामच्या लखिमपूरचे खासदार सोनोवाल यांच्या तरुण खांद्यांवर भाजपासाठी ईशान्येचे द्वार खुले करण्याची जबाबदारी सोपविली होती.
31 ऑक्टोबर 1962 रोजी आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात जन्मलेले 54 वर्षीय सोनोवाल यांनी महाविद्यालयीन राजकारण ते केंद्रीय मंत्रिपद असा प्रवास केला आहे. 1992 ते 1999 या कालावधीत ते ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचे (आसू) अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात या विद्यार्थी संघटनेचा बराच प्रभाव असून आसूने सहा वर्षे आसाम आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी 8 फेब्रुवारी 2011 रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रथम पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि नंतर राज्यात भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
पुढे 2012 मध्ये सोनोवाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आणि आजही ते या पदावर कायम आहेत. या वर्षी 28 जानेवारीला पक्षाने त्यांना आसाममध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते. सोनोवाल सर्वप्रथम 2क्क्1 साली मोरन विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. परंतु 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते दिब्रुगडमधून निवडून गेले होते.
गोगोईंची जादू चाललीच नाही
सत्ताविरोधी लाट व वाढत्या वयोमानामुळे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई या वेळी विधानसभा निवडणुकीत व्यक्तिमत्त्वाची जादू पसरविण्यात अपयशी ठरले. गेल्या निवडणुकीर्पयत हॅट्ट्रिक मारणारे काँग्रेसचे हे दिग्गज नेते या वेळी विजयाचा चौकार मारू शकले नाहीत. अंतर्गत शत्रूंमुळे 8क् वर्षीय गोगोई यांनी निवडणुकीत पक्षाची नौका एकटय़ाने वल्हवण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसच्या दिशेने येणारे वादळ परतवण्यात ते अपयशी ठरले. दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या आसामला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्याचे श्रेय गोगोई यांना जाते.
परंतु मुख्यमंत्रिपदाच्या तिस:या कार्यकाळात त्यांना प्रचंड विरोध होऊ लागला होता आणि विरोधाच्या या आगीत तेल ओतण्याचे काम एकेकाळी गोगोईंचे अत्यंत लाडके नेता हिमंता बिस्वा शर्मा यांनी केले. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघणारे शर्मा यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आमदारांच्या एका गटाला सोबत घेत बंडखोरीचा ङोंडा हाती घेतला होता. परंतु काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे गोगोई आपली सत्ता वाचविण्यात यशस्वी ठरले होते. दुस-या कार्यकाळात काही उतारचढाव बघितल्यानंतर तिस:या कार्यकाळात गोगोईंना प्रकृतीने साथ दिली नाही.
(वृत्तसंस्था)