UP Assembly Election: अरे आंघोळ तरी करू द्या रे! स्नान करत असलेल्या व्यक्तीकडे मत मागायला गेले आमदार; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:47 PM2022-01-14T12:47:45+5:302022-01-14T12:49:39+5:30
UP Assembly Election: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; उमेदवारांचा प्रचार सुरू
लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. पुढील महिन्यापासून मतदानाला सुरुवात होईल. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रचारावर निर्बंध आले आहेत. मात्र तरीही विद्यमान आमदार, इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जात आहे. या दरम्यान एक लक्षवेधी प्रकार घडला आहे.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं निवडणूक आयोगानं प्रचारावर मर्यादा आणल्या आहेत. मात्र नेते, आमदार, कार्यकर्ते प्रचारात मागे नाहीत. गोविंद नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र मैथानी यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. मैथानी पनकी येथे पोहोचला असताना एक अजब प्रकार घडला.
पनकीचा दौरा करताना मैथानी यांनी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. आपल्यालाच मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं. मैथानी गलोगल्ली फिरत होते. त्यावेळी तिथे एक व्यक्ती आंघोळ करत होती. त्या व्यक्तीचं राजू होतं. मैथानी यांनी परिस्थिती लक्षात घेत राजू यांचं अभिनंदन केलं. राजू यांना सरकारी योजनेतून घर मिळालं हे लक्षात घेऊन मैथानी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. आपल्याकडे असलेलं प्रचारसाहित्य त्यांनी राजू यांना दिलं आणि भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन केलं.