Assembly Election 2022: उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह पाचही राज्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक आणि निकालाची तारीख एका क्लिकवर.…
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:01 PM2022-01-08T17:01:01+5:302022-01-08T17:03:38+5:30
Assembly Election 2022: लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्पात आणि पंजाब, उत्तराखंड व गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर सर्व निवडणुकीची मतमोजणी ही १० मार्च रोजी होणार आहे.
नवी दिल्ली - देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण सात टप्प्यात ह्या निवडणुका होणार असून, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्पात आणि पंजाब, उत्तराखंड व गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर सर्व निवडणुकीची मतमोजणी ही १० मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम हा पुढीलप्रमाणे आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
पहिला टप्पाः १० फेब्रुवारी २०२२
दुसरा टप्पाः १४ फेब्रुवारी २०२२
तिसरा टप्पाः २० फेब्रुवारी २०२२
चौथा टप्पाः २३ फेब्रुवारी २०२२
पाचवा टप्पाः २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पाः ३ मार्च २०२२
सातवा टप्पाः ७ मार्च २०२२
मतमोजणीः १० मार्च २०२२
पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२
मतमोजणीः १० मार्च २०२२
गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२
मतमोजणीः १० मार्च २०२२
उत्तराखंडमध्येही एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२
मतमोजणीः १० मार्च २०२२
मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिला टप्पा - २७ फेब्रुवारी
दुसरा टप्पा -३ मार्च
मतमोजणीः १० मार्च २०२२